Onion Rate : कांदा उत्पादकांसाठी अच्छे दिन, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय वाचा सविस्तर!

Onion Rate : कांदा उत्पादकांसाठी अच्छे दिन, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय वाचा सविस्तर!

 

कांदा उत्पादकांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता कांद्याचे भाव स्थिर राहण्याची शक्यता आहे. साठेबाजी करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी आणि कांद्याचे भाव स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांदा उत्पादन हंगामात मजबूत बफर स्टॉक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.

केंद्र सरकारने यासाठी सहकारी नाफेडला अडीच लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट दिले आहे. आतापर्यंत दोन लाख टन इतके बफर झाले आहे. खरेदी एजन्सी मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या उत्पादक राज्यांमध्ये पुढे जाऊन कांद्याचा साठाही खरेदी करत आहे. केंद्र सरकारने गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही संरक्षित साठ्यासाठी (बफर स्टॉक) कांदा खरेदी सुरू केली आहे.

आतापर्यंत 52 हजार 460 टन कांद्याची खरेदी करण्यात आली आहे. नाफेडच्या माध्यमातून ही खरेदी करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून सरकार कांद्याचा बफर स्टॉक करत आहे. तुटवड्याच्या काळात देखील कांद्याचे दर नियंत्रणात राहावे यासाठी हा साठा करण्यात येत आहे.

2022-23 मध्ये कांदा उत्पादनात 16.8 टक्के वाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सुमारे 311 लाख टन कांदा उत्पादन होऊ शकतो. गेल्या हंगामात जवळपास 266 लाख टन कांदा उत्पादन झाले होते.

हे पण वाचा :- दर्जेदार हरभऱ्याला मागणी, हरभरा भावात सुधारणा..!

दरम्यान येत्या दोन आठवड्यात खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता आहे. कांद्याचा तुटवडा हा ऑगस्ट ते ऑक्टोबर मध्ये मोठ्या प्रमाणात असतो. तेव्हा कांद्याचे भाव सातव्या गगनाला भिडतात.

केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी टोमॅटो, कांदा आणि बटाटा यासाठी ऑपरेशन ग्रीन योजना सुरू केली होती. ज्यांची कामगिरी फारशी समाधानकारक नव्हती. मात्र बफर स्टॉकच्या माध्यमातून शेतमाल बाजारात या भाज्यांची भाववाढ नियंत्रित करण्याचे धोरण प्रभावी ठरले आहे.

source :- krushijagran