Onion Rate : कांदा दारावर होणार का परिणाम, ‘नाफेड’ चे कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण!

Onion Rate : कांदा दारावर होणार का परिणाम, ‘नाफेड’ चे कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण!

 

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध बाजार समितींमध्ये नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केली जात होती. अनेक वेळा दरातील तफावतीमुळे कांदा संघटना आणि नाफेडमध्ये मतभेदही झाले. असे असले तरी शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळत होता. मात्र, आता कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यामुळे सोमवारपासून नाफेडकडून कांद्याची खरेदी केली जाणार नाही. त्यामुळे त्याचा परिणाम आता दरावर कसा होणार हे पहावे लागणार आहे. यातच पावसामुळे चाळीत साठवलेला कांदा हा खराब झाला आहे. त्यामुळे कांदा पुन्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणार का असा सवाल उपस्थित होत आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना नाफेड खरेदीचा आधार होता.

शेतकऱ्यांना मिळाला सरासरीचा दर

यंदा अडीच लाख मेट्रिक टन कांद्याचे खरेदीचे उद्दिष्ट नाफेडने ठेवले होते. 16 एप्रिल पासून महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात येथील काही बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी सुरू होती सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला सरासरी 1 हजार 200 तर कमाल 1 हजार 436 रुपये दर मिळला आहे. रब्बी हंगामातील कांद्याची काढणी होताच दरात मोठी घसरण झाली होती. त्यामुळे नाफेडच्या माध्यमातून का होईना दिलासा मिळेल असा दर शेतकऱ्यांना मिळालेला आहे. मात्र, उद्दिष्टपूर्ण झाल्यामुळे सोमवारपासून कांदा दराचे चित्र काय राहणार हे पहावे लागणार आहे.

हे पण वाचा:- E-pik pahani : ‘ई-पीक पाहणी’बाबत मोठा निर्णय, प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्वाची बातमी

साठवलेला कांदा नासला

भविष्यात कांद्याला अधिकचा दर मिळेल म्हणून नाशिक जिल्ह्यातील शेतकरी हे कांदा चाळीत कांदा साठवणूकीवर भर देतात. यंदा नाफेडच्या माध्यमातून खरेदी सुरु असताना देखील अनेक शेतकऱ्यांनी साठवणूकीवर भर दिला होता. मात्र, गेल्या 10 दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी व संततधार यामुळे कांदा चाळीत साठवलेल्या कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

हे पण वाचा:- Drip Irrigation Grant : महत्वाची बातमी, शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 कोटी जमा; तब्बल ‘इतक्या’ शेतकऱ्यांची केली निवड!

शेतकऱ्यांचे लक्ष सोमवारच्या दरावर

नाफेडची खरेदी बंद झाल्यानंतर प्रथमच सोमवारी बाजार भरणार आहे. त्यामुळे कांद्याची आवक ही वाढणार आहे. मागणी असली तर दर कायम राहतील अन्यथा पूर्वीप्रमाणे घसरतील असाच अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. खरिपात अधिकच्या पावसामुळे अद्यापही कांद्याची लागवड झालेली नाही. त्यामुळे साठवलेल्या कांद्याला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.