कुक्कुटपालन पावसाळ्यातील-व्यवस्थापन

कुक्कुटपालन पावसाळ्यातील-व्यवस्थापन

सतत होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे कोंबड्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो त्यांना विविध आजार देखील होत असतात उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ह्या ऋतूत कोंबड्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात वातावरण दमट असल्याने जंतुसंसर्ग रोग प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते.
ह्यामुळे कोंबड्यांच्या आरोग्याची काळजी आणि कोंबड्यांच्या घराची स्वच्छता अधिकाधिक प्रमाणात ठेवावी लागते पावसाळाच्या सुरुवातीलाच उन्हाळा च्या शेवट असतो तेव्हा आपण पक्षांना योग्य ते लसीकरण केले पाहिजे जेणेकरून वातावरणाच्या बदलाचा पक्षांवर तणाव येणार नाही..
पोल्ट्री शेड हे मजबूत असावे जेणेकरून पावसाळ्यात होणाऱ्या वादळी वाऱ्यापासून वाचावं होईल पावसाळ्यापूर्वी शेडवरील पत्रे मजबूत करावेत जेणेकरून पावसाळ्यात वादळी वाऱ्यात वावटळ मध्ये पत्रे हलणार किंव्हा उडून जाणार नाहीत.
पावसाच्या पाण्यामुळे पक्षी भिजणार नाही ह्याची खबरदारी घ्यावी पोल्ट्री शेड च्या परिसरात स्वच्छता ठेवावी. रान जास्त वाढू देऊ नये.
पावसाचे पाणी साचून चिखल दलदल होणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
पावसाचे पाणी सहज रित्या वाहून जाईल ह्यासाठी चर खोदावी..
शेडमध्ये आपण बाहेरील बाजूने जे पडदे वापरतो ते प्लास्टिक चे असावेत.
पडद्याची उघडझाप पावसाप्रमाणे करावी म्हणजेच दिवस पाऊस नसेल आणि सूर्यप्रकाश असेल तेव्हा पडदे उघडावेत ह्यामुळे शेडमधील हवा खेळती राहून वातावरण चांगले राहते पक्षांना त्रास होत नाही .
प्लास्टिक च्या पडद्यांचा दुहेरी उपयोग होतो त्यामुळे हवा सरळ शेडमध्ये न जाता बाहेर अडवली जाते पक्षांचे थंड हवेपासून रक्षण होते तसेच पावसाचे पाणी ही सरळ शेडमध्ये जात नाही पडद्याची बांधणी करताना ती वरील बाजूस एक दीड फूट खाली बांधावी ह्यामुळे हवेचे योग्य नियमन होऊन हवा खेळती राहण्यास मदत होते.
पावसाळ्यात जास्त वेळ पडदे खाली ठेवल्यास शेडमध्ये योग्य प्रकारे हवा खेळती राहत नाही हवा आत कोंडली जाते ह्यामुळे अनेक समस्या उद्भवतात शेडमध्ये अमोनिया आणि मिथेन सारखे विषारी वायू तयार होतात.
हवेचे योग्य नियमन होत नसल्याने हे वायू आतमध्ये कोंडले रहातात आणि पक्षांना स्वच्छ शुद्ध हवेचा पुरवठा होत नाही पावसाळ्यात शेडमधील गादीकडे पण विशेष लक्ष दिले पाहिजे दिवसातून किमान एक वेळा तरी गादी वर खाली हलवून घ्यावी.
ओल्या दमट गादीमुळे शेडमधील वातावरण दूषित होते ओलसर दमट गादीमध्ये रोगजंतूंची वाढ झपाट्याने होते अश्या वेळी पक्षी विविध आजाराला बळी पडण्याचे प्रमाण वाढते.
जास्त प्रमाणात ओल्या झालेल्या गादीचा तेवढा भाग काढून त्या जागी नवीन गादी टाकावी. गादी मधील आद्रतेचे प्रमाण कमी असावे जास्त वाटत असल्यास योग्य प्रमाणात चुना मिसळावा..
शेडमधील गादी ओली असल्याने जंतूंचे प्रमाण वाढते हवेमध्ये आद्रतेचे प्रमाण अधिक असल्याने गाडीमध्ये ओलसर पणा जास्त तयार होतो. त्यामध्ये कोंबड्याची विष्टा, खाद्य आणि पाणी ह्यांचा समावेश झाल्यामुळे रोगाचा प्रसार होतो.
ओल्या गादीमुळे रक्ती हगवण ह्यासारख्या रागाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. शेडमधील अमोनिया वायूमुळे कोंबड्यांना श्वसन संस्थेचे आजार आणि डोळ्यांचे आजार होऊ शकतात.. शेडमध्ये माश्यांचा प्रादुर्भाव होणार नाही ह्याची काळजी घ्यावी.
पक्षांना खाद्य देण्यापूर्वी ते तपासून दयावे. खाद्य ठेवण्याची जागा स्वच्छ आणि कोरडी असावी. खराब असलेले खाद्य पक्षांना देऊ नये.
कोंबड्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी पुरवावे. पिण्याच्या पाण्यात योग्य प्रमाणात जंतुनाशके मिसळावीत. पाण्याची लोखंडी टाकी असल्यास ती गंजणार नाही ह्याची काळजी घ्यावी आणि सिमेंट ची टाकी असल्यास टाकीला आतून चुना लावून घ्यावा जेणेकरून टाकीमध्ये शेवाळ वाढणार नाही…
कोंबड्यांना देण्यात येणाऱ्या खाद्यात पण काळजी घेणे गरजेचे आहे खाद्यपदार्थात जास्त ओलावा असल्यास बुरशी वाढण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे खाद्यात विषारी मेंटबोलाईट्स तयार होतात.
असे खराब खाद्य कोंबड्यांना दिले तर त्यांना मायकोटॉक्सिकोसिस होण्याचे प्रमाण वाढते परिणामी मृत्यूदारात वाढ होते म्हणून खाद्य ठेवण्याची जागा स्वच्छ व कोरडी असावी शक्यतो पावसाळ्यात खाद्याची वाहतूक करू नये खाद्यामध्ये शिफारशी नुसार कॅक्सिडीओस्टॅट औषधांचा औषधांचा आणि बुरशीनाशक औषधांचा वापर करावा.
खाद्यात अँटीऑक्सिडंट मिसळावे.. पोल्ट्री शेडच्या सभोवतालची दलदल, गवत काढून टाकावे. परिसरातील जागा स्वच्छ ठेवावी. पावसाचे पाणी साठून राहू नये म्हणून खड्डे बुजवून घ्यावेत. पाणी वाहून जाण्यासाठी शेडच्या बाजूने चर खोदावेत. पाण्याची टाकी लोखंडी असल्यास ती गंजू नये म्हणून तिला आतून व बाहेरून रेड ऑक्‍साईड लावून घ्यावे.
भिंत सिमेंट विटांनी बांधलेली असेल तर आतून व बाहेरून चुना लावावा. कोंबडी खाद्य तपासून घ्यावे. पावसाळ्यात पाणी दूषित होण्याची शक्‍यता जास्त असते. ब्रॉयलर कोंबड्यांना अशुद्ध पाणी दिले तर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असते. कोंबड्यांना द्यावयाच्या पिण्याच्या पाण्यामध्ये शिफारशीत जंतुनाशके योग्य प्रमाणात मिसळावीत.
खाद्य ठेवण्याची जागा स्वच्छ व कोरडी असावी. खाद्यांच्या गोण्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गाठी झाल्यास असे खाद्य पक्ष्यांना देऊ नये.

Leave a Comment