पेरू लागवड माहिती-तंत्रज्ञान
पेरू पिकाची माहिती मराठी (peru crop information in marathi)
महाराष्ट्रात पेरूची मोठया प्रमाणत लागवड केली जाते.या फळात जीवनसत्व क मोठया प्रमाणात आहे बाजार पेठे मध्ये या भरपूर प्रमाणात मागणी आहे. या फळ पासून जॅम,जेली, सुद्धा बनवली जाते .
जमिनीम पाण्याचा निचरा होणारी जमीन यासाठी योग्य आहे.जमिनीचा सामू ६ ते ६.५ दरम्यान असावा.
हवामान:-
या पिकाची लागवड उष्ण व समशीतोष्ण हवामानात केली जाते.
पेरू पिकाची जाती (Peru crop varieties)
चिट्टीदार, सरदार, आराका किरण, हिसार सफेद, श्वेता इत्यादी
सुधारित जाती:
पेरूच्या अनेक सुधारती जाती उपलब्ध आहेत. यापैकी व्यापारीदृष्ट्या सरदार (लखनऊ-49) व ललित या जातींची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. यामध्ये सरदार (लखनऊ-49) ही जात अधिक उत्पादन आणि चांगल्या प्रतीची फळे देणारी आहे. पेरू लागवड माहिती-तंत्रज्ञान
लागवड:-
दाब कलम करून याची रोपे तयार केली जातात .आणि त्या नंतर ६० X ६० X ६० सें.मी आकाराचे खड्डे घेऊन २ कि. सिंगलसुपर फॉस्फेट खत टाकावे. ५ % मॅलॅथिआन (५०-६० ग्रॅम) पावडर मिसळावी. दोन झाडातील व ओळीतील अंतर ६ X ६ मीटर प्रति हेक्टरी झाडांची संख्या २७७ घन लागवडासाठी ३ X २ मी. अंतर ठेवावे.
पारंपारिक पेरू लागवडीचे तोटे (Disadvantages of traditional Peruvian cultivation) :
- पारंपारिक पेरू लागवड पध्दतीमध्ये 200 X 20 फूट अंतरावर लागवड केली जाते. लागवड केल्यानंतर चौथ्या वर्षानंतर उत्पादनास सुरूवात होते. फळांच्या काढणीनंतर छाटणी केली जात नाही.
- छाटणी करण्यामूळे बागांमध्ये फांद्यांची दाटी होते. यामूळे सूर्यप्रकाश जमीनीपर्यंत पोहचत नाही. व जमीन लवकर वाफसा स्थितीमध्ये येत नाही.
- पारंपारिक पाणी व्यवस्थापनामध्ये झाडाभोवती गोल किंवा चौकोणी आळे तयार करून जास्त प्रमाणात पाणी दिले जाते. पाणी देण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर कमी असते. त्यामूळे बागेमध्ये ओलावा व आर्द्रता वाढल्यामूळे फळमाशीचे प्रमाण वाढते.
- झाडांना शेणखत किंवा सेंद्रीय खताचा वापर कमी केल्यामूळे रासायनिक खतांचा वापर जास्त असल्यामूळे जमिनीतील सामू-क्षारांचे प्रमाण वाढते. व पांढरी मूळी जास्त वाढत नाही. परिणामी फळांचा आकार वाढत नाही. आणि पुढे लवकर परिपक्व होऊन गळतात
खत व्यवस्थापन:-
पूर्ण वाढ झालेल्या झाडाला ४ ते ५ घमेली शेणखत ३०० ग्राम स्फुरद व ३०० ग्राम पालाश बहर धरते वेळी दयावी व उरलेले खताची मात्रा फळे लागतील त्यावेळी दयावी.
पाणी व्यवस्थापन:-
रोपाच्या सुरवातीच्या वाढीच्या काळात नियमित पा णी दयावे. त्यानंतर जमिनीच्या मगदूर नुसार पाणी दयावे.तसेच फुल व फळ धरणेच्या काळात पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी . पेरू लागवड माहिती-तंत्रज्ञान: agriculture information in marathi
Pm Kisan Yojana: तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर इथे करा तक्रार
रोग नियंत्रण:-
किडी:-
१) फळमाशी – फळांचा आतील भाग मध्ये आढळते ती आतील भागावर उपजीविका करते.
उपाय:-
१) किडलेली फळे काढून टाकून शेताच्या बाहेर पुरावी
2) किडी होऊ नये म्हणून प्रथम निमार्क ची ६० ते ७५ मिली १५ लिटरच्या पंपाला फवारणी करावी.
३) शेता मध्ये ४ ते ५ रक्षक सापळे बसवावेत
२) फुल किडे ,मावा ,तुडतुडे ,पांढरी माशी – निमार्क ची २५/३० मिली फवारणी करावी
३) पिठ्या ढेकूण – या च्या नियंत्रण साठी जैविक व्हर्टिसीलियम ५० ग्राम + १०० मिली दूध १० लिटर पाण्यात मिसळून फवारवे
छाटणीचे वेळापत्रक:-
अ.क्र | महिना व करावयाची कामे | छाटणी संदर्भात माहिती |
1 | पेरूची लागवड | दाब कलमांच्या रोपांची लागवड करावी |
2 | लागवडीनंतर 3 महिन्यांनी | जमिनीपासून 60 सेमी अंतरावर शेंडा तोडणी/कट करावा |
3 | पहिल्या छाटणीनंतर 3 महिन्यांनी परत दुसरी छाट्णी करावी. (लागवडीनंतर 6 महिन्यांनी) | 3-4 फांद्या चारी बाजूने सारख्या अंतरावर ठेवून इतर फांद्या काढून टाकाव्यात |
4 | दुसऱ्या छाटणीनंतर 2-2.5 महिन्यांनी परत तिसरी छाटणी करावी (लागवडीनंतर 9 महिन्यांनी) | चार फांद्या ज्या ठेवल्या आहेत (प्राथमांक) या फांद्यांची 50 टक्के (अर्धा) छाटणी करावी व खालचा 50 टक्के (अर्धा) भाग जो परिपक्व व तांबड्या रंगाचा आहे तोच भाग ठेवावा. |
5 | तिसर्या छाटणीनंतर परत पुन्हा 3 महिन्यांनी फांद्यांची चौथी छाटणी करावी (लागवडीनंतर 12 महिन्यांनी) | ज्या परिपक्व फांद्या ठेवलेल्या आहेत त्या फांद्यांची 50 टक्के शेंडा छाटणी करावी म्हणजेच या ठिकाणी फुले लागतात व फळधारणा होते. |
6 | लागवडीनंतर 1 (महिन्यांची 1.5 वर्षानंतर) | पहिल्यांदा फळधारणा होते. |
7 | फळे काढणी केल्यानंतर (लागवडीनंतर 23 महिन्यांनी किंवा फळधारणेनंतर 5 महिन्यांनी) | एकुण फांदीच्या 50 टक्के फांदीची छाटणी करावी. (सर्व फांद्या- बॅक प्रुनिंग) |
8 | छाटणीनंतर दोन महिन्यांनी (लागवडीनंतर 25 महिन्यांनी) | दुसरी फळधारणा |
9 | लागवडीनंतर 30 महिन्यांनी | तिसरी फळधारणा |
- पहिली फळधारणा लागवडीनंतर 18 महिन्यांनी
- फळे काढणी केल्यानंतर पुन्हा एकदा एकूण फांदीच्या 50 टक्के फांदीची छाटणी करावी. (सर्व फांद्याची-बॅक प्रुनिंग करावी)
- छाटणीनंतर पुन्हा दोन ते तीन महिन्यात परत फळधारणा चालु होते.
तुलना: पारंपारिक लागवड आणि सघन लागवड पध्दती:-
अ.क्र | तुलनात्मक मुद्दा | पारंपारिक लागवड पद्धत | सघन लागवड पद्धत |
1 | फळधारणा | तिसऱ्या वर्षापासून चालू होते | पहिल्या वर्षापासून चालू होते |
2 | उत्पादन | 12-15 टन/हेक्टर | 30-45 टन/हेक्टर |
3 | व्यवस्थापन | झाडाचा आकार मोठा असल्याने थोडे अवघड होते | झाडाचा आकार लहान असल्यामूळे सोपे होते |
4 | मजूर | जास्त | कमी |
5 | उत्पादन खर्च | जास्त | कमी |
6 | तोडणी / काढणी | अवघड | सोपी |
7 | फळांचा दर्जा | मोठा आकार, विस्तार, जास्त फांद्या, यामुळे फांद्यांना सूर्यप्रकाश मिळत नाही. त्यामुळे फळांचा दर्जा चांगला मिली नाही | झाडांचा कमी विस्तार यामुळे सर्व फांद्यांना सूर्यप्रकाश मिळतो, हवा खेळती राहते, रोग व कीड कमी प्रमाणात येते व सर्व फांद्यांना व फळांना सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे फळांचा दर्जा व उत्पादन सुधारते |
उत्पादन
या फळाची काढणी फळांचा आकार वाढला की तसेच हिरवा वाढला की तसेच हिरवा वाढला की तसेच हिरवावाढला की तसेच हिरवा पेरू लागवड माहिती-तंत्रज्ञान
आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या
शेती विषयक माहिती pdf