Pik Vima Yojana : प्रधानमंत्री पीक विमा योजना संदर्भात कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मोठे आवाहन, आजच करा हे काम

Pik Vima Yojana : प्रधानमंत्री पीक विमा योजना संदर्भात कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मोठे आवाहन, आजच करा हे काम

केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असतं, ज्यातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतो. यामधील एक योजना म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना. या योजनेबाबद कृषी विभागाने शेतकऱ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.

केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना जाहीर केली आहे. कृषी विभागाने या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी सुरू करण्यास सुरुवात केली आहे.

नगर जिल्ह्यात आतापर्यंत 58 हजार 979 शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला आहे. अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही. योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलैपयर्यंत मुदत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

विशेष म्हणजे सरकारने खरीप व रब्बी या दोन्ही हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना जाहीर करून या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची नावनोंदणी सुरू आहे. नगर जिल्ह्यासाठी एचडीएफसी एर्गो कंपनी नियुक्त करण्यात आली आहे.

सीएससी केंद्रांद्वारे ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली जात आहे. या योजनेबाबत शेतकऱ्यांना काही अडचणी असतील, त्यांच्या काही तक्रारी असतील किंवा त्यांना आधिक माहिती पाहिजे असेल तर यासाठी कंपनीने प्रत्येक तालुक्यात प्रतिनिधी नियुक्त केले आहेत.

हे पण वाचा :- पुढील ‘या’ महिन्यामध्ये ३ वेळा होऊ शकते अतिवृष्टी,ऑगस्टमध्ये 10 ते 12 दिवस

मागच्या वर्षात नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या जवळपास 45 हजार शेतकऱ्यांना 26 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. पीक काढणीस येण्याच्या साधारण पंधरा दिवस अगोदर पीक नुकसानीच्या घटना घडतात. अशा वेळी पीक विमा घेतला असेल तर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान काही प्रमाणात कमी होत असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.

source :- krushi jagran