Pm kisan E-kyc : ई-केवायसी नाही केली तर मिळणार का पीएम किसान योजनेचा 11वा हफ्ता

Pm kisan E-kyc : ई-केवायसी नाही केली तर मिळणार का पीएम किसान योजनेचा 11वा हफ्ता

 
पीएम किसान सन्मान निधी योजना  ही भारत सरकारद्वारे सुरु करण्यात आलेली महत्वाची योजना आहे. या योजनेला आता चार वर्ष पूर्ण होतं आली आहेत. या चार वर्षात केंद्र सरकारच्या  या महत्त्वाकांक्षी योजनेत अनेक नवनवीन बदल केले गेले आहेत.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ही योजना सर्वस्वी केंद्र सरकारच्या अर्थसहाय्याद्वारे चालवली जात आहे. यामुळे केंद्र सरकारने यात सध्या अनेक मोठे बदल केले आहेत. मध्यंतरी, या योजनेचा अनेक बोगस शेतकऱ्यांनी (Farmer) चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला होता यामुळे केंद्र सरकारने यावर कठोर उपाययोजना करत ई-केवायसी बंधनकारक केली होती.
दरम्यान, केंद्र सरकारने ई-केवायसी (E-KYC) करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी येत असल्याने ई-केवायसी प्रक्रिया करण्यासाठी 31 मार्च जी शेवटची तारीख ठरवली होती त्यात मुदतवाढ दिली असून आता 31 मे ही शेवटची तारीख ठरवण्यात आली आहे.
आतापर्यंत या योजनेअंतर्गत दहा हफ्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत आणि अकराव्या हफ्त्याबाबत अजून केंद्र सरकारकडून कोणतीचं घोषणा करण्यात आलेली नाही. यामुळे ई-केवायसी केलेली नसेल अशा शेतकऱ्यांना या योजनेचा अकरावा हप्ता मिळेल की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे.
मात्र आता बिहार सरकारने याबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. बिहार मध्ये या योजनेचे एकूण 85 लाख पात्र शेतकरी आहेत मात्र एवढ्या शेतकऱ्यांपैकी सुमारे 36 लाख शेतकऱ्यांनी या योजनेसाठी केवायसी केलेली नाही. आता बिहार सरकारने एक मोठं अपडेट देत हे स्पष्ट केले आहे की, ज्या लोकांनी केवायसी केलेली नाही त्यांनादेखील या योजनेचा अकरावा हप्ता दिला जाणार आहे. यामुळे इतर राज्यातील शेतकऱ्यांनी देखील केवायसी केलेली नसेल तर त्यांनाही या योजनेचा अकरावा हफ्ता मिळेल असे सांगितले जात आहे.
हे पण वाचा:- Hvaman Andaj : मे महिन्यात उन्हाच्या कडाक्यापासून दिलासा मिळणार, 109% पूर्वमोसमी पावसाचा अंदाज
11व्या हफ्त्याबाबत मिडिया रिपोर्टमध्ये दावा केला जातं आहे की, 11 वा हफ्ता 15 मे च्या सुमारास पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाईल. यामुळे आता शेतकऱ्यांना 11 व्या हफ्त्याची आतुरता लागली आहे. असे असले तरी ई-केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना 31 मे ही शेवटची तारीख देण्यात आली आहे यामुळे लवकरात लवकर केवायसी शेतकऱ्यांना केवायसी करावी लागणार आहे.
संदर्भ:- कृषी जागरण
लेखक:- अजय वसंत शिंदे

1 thought on “Pm kisan E-kyc : ई-केवायसी नाही केली तर मिळणार का पीएम किसान योजनेचा 11वा हफ्ता”

  1. चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद शिंदे सर 🙏

    Reply

Leave a Comment