Pm kisan e-kyc : १२ हफ्ता मिळवायचा असल्यास करा हे काम कारण आता उरला फक्त एक दिवस

Pm kisan e-kyc : १२ हफ्ता मिळवायचा असल्यास करा हे काम कारण आता उरला फक्त एक दिवस

 

पीएम किसान योजनेचा 12 हप्ता आता काही महिन्यांमध्येच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. 2018 पासून या योजनेचा लाभ देशातील 10 कोटीहून अधिक शेतकरी घेत आहेत. ही योजना  केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरु असली तरी राज्यातील कृषी आणि महसूल विभागाची महत्वाची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपये आर्थिक मदत केली जाते. यावेळचा हप्ता हा 12 हप्ता असणार आहे तर हा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना  ‘ई-केवायसी’ ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. योजनेमध्ये तत्परता आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळावा या अनुशंगाने हा नियम घालून देण्यात आला आहे.

आतापर्यंत दोन वेळा मुदतावाढ देण्यात आली होती. त्यामुळे यावेळी मुदतवाढ मिळणार का हे देखील पहावे लागणार आहे. मात्र, जो शेतकरी ही प्रक्रिया पूर्ण करणार नाही त्यांना योजनेचा लाभ नाही हे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे.

म्हणून ‘ई-केवायसी’ वर सरकारचा भर

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीकामामध्ये आर्थिक हातभार मिळावा या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे. असे असताना अनेकजण पात्र नसतानाही योजनेचा लाभ घेत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आल्याने हा नियम लादण्यात आला आहे.

ई-केवायसीमध्ये आधार लिंक करावे लागणार आहे. त्यामधून खातेदाराची संपूर्ण माहिती सरकारला मिळणार व जे योजनेसाठी पात्र त्यांच्याच खात्यामध्ये योजनेची रक्कम ही जमा केली जाणार आहे. लाखो लाभार्थी असे आहेत जे योजनेसाठी पात्र नाहीत. त्यांच्याकडून आता वसुलीची मोहिम राबवली जात आहे, पण भविष्यात अशा शेतकऱ्यांना लाभ मिळू नये म्हणून ई-केवायसी हे बंधनाकरक करण्यात आले आहे.

11 कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ

देशातील 11 कोटी शेतकऱ्यांना हा 12 हप्ता मिळणार आहे. त्याअनुशंगाने केंद्र सरकार 11 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करु शकते. ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता करण्याचे काम नाही पण त्यापूर्वी केवळ ही ‘ई-केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. 31 जुलै ही अंतिम मुदत असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे आता केवळ एक दिवस उरलेला आहे. सीएससी केंद्रावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

अशा पध्दताने करा ‘ई-केवायसी’

आता eKYC करायची असेल तर www.pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावे लागणार आहे. त्यानंतर पी. एम. किसान योजनेची अधिकृत वेबसाईट तुमच्या स्क्रीनवर दिसेल.वेबसाइट ओपन झाल्यावर सगळ्यात अगोदर तुम्हाला लाल अक्षरांमध्ये एक सूचना दिसेल ती अशी की eKYC is mandatory for PMKISAN Registered farmers, pls click ekyc option in former corner for aadhar based OTP authentication and for biometric authentication contact nearest CSC centres याचा अर्थ तुम्ही तर पी एम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला केवायसी करणे बंधनकारक असणार आहे.आता केवायसी करण्यासाठी दोन पर्याय आहेत एक म्हणजे तुमचा फोन नंबर आधार कार्ड से लिंक असेल तर तुम्ही आधार बेस्ट केवायसी करू शकता त्यासाठी फार्मर कॉर्नर मध्येही केवायसी ला क्लिक करायचे आहे मोबाईल नंबर आधार कार्ड सिलिंग नसेल तर सीएससी केंद्रावर जाऊन कागद पत्र देऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

हे पण वाचा:- Land Aadhaar Card: आता जमिनीचेही मिळणार आधारकार्ड, वाचा सविस्तर…!

आधारकार्ड वापरून eKYC कसे करायचे? फार्मर कॉर्नर वरती eKYC ला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आधार केवायसी नावाचे एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल त्यामध्ये सुरुवातीला आधार कार्ड क्रमांक त्यानंतर समोरच्या बॉक्समधील अक्षरे आणि अंक आहेत तशी टाकायची आहेत. त्यानंतर search या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये सुरुवातीला आधार नंबर दिसेल त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक आहे तोच येथे टाकायचा आहे…त्यानंतर Get Otp यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर मोबाईलवर OTP नंबर येईल तो OTP येथे submit करायचा आहे. त्यानंतर submit for Auth यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर EKYC is successful submitted असा sms दिसेल. याचाच अर्थ ekyc submitted यशस्वी झाला आहे.

source:- tv9 marathi