PM Kisan eKYC : पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी कशी करायची?

PM Kisan eKYC : पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी कशी करायची?

 

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा अकरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे.

आता इथून पुढच्या हप्त्यांसाठी केंद्र सरकारनं ई-केवायसी करणं बंधनकारक केलं आहे.

त्यामुळे मार्च 2022 नंतरचे हप्ते मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं अनिवार्य आहे. आता शेतकरी स्वत: पीएम किसानच्या वेबसाईटवरून ई-केवायसी करू शकतात.

कशी ते जाणून घेऊया…

पीएम किसान योजना काय आहे?

पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

दर 4 महिन्यांच्या अंतरानं 2 हजार रुपयांचा हप्ता, अशापद्धतीनं 3 हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

साधारणपणे, दरवर्षी एप्रिल महिन्यात पहिला, ऑगस्टमध्ये दुसरा तर डिसेंबरमध्ये तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो.

  • eKYC कशी करायची?
  • eKYC म्हणजेच Electronic Know your Client. या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं तुमची ओळख पडताळून पाहिली जाते.
  • आता पीएम किसान योजनेसाठी eKYC करायची असेल, तर सगळ्यात आधी तुम्हाला pmkisan.gov.in असं सर्च करायचं आहे. त्यानंतर पीएम किसान सन्मान निधीची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.
  • याचा अर्थ पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे. ओटीपी बेस्ड ई-केवायसीची सुविधा पीएम किसानच्या पोर्टलवर उपलब्ध आहे. eKYC करण्यासाठीची मुदत 31 मे 2022 पर्यंत आहे.
  • eKYC करण्यासाठी इथं 2 पर्याय सांगितलेत.
  • एक म्हणजे जर तुमचा फोन नंबर आधार कार्डाशी लिंक असेल तर तुम्ही Aadhar based OTP authentication वापरून eKYC करू शकता. त्यासाठी फार्मर कॉर्नरमधील eKYC या पर्यायावर क्लिक करा. पण, जर तुम्हाला Biometric authentication करायचं असेल, तर जवळच्या सीएससी सेंटरला भेट द्यावी लागेल.
  • आता यातला पहिला पर्याय म्हणजे आधार कार्ड वापरून eKYC कसं करायचं ते पाहूया.
  • यासाठी तुम्हाला Farmers Corner मधील eKYC या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  • त्यानंतर Aadhar eKYC नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
  • इथं सुरुवातीला तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा क्रमांक आणि पुढच्या रकान्यात दिसणारे आकडे आणि अक्षरं जशीच्या तशी टाकायची आहेत.
  • हे टाकून झालं की समोरच्या Search या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  • त्यानंतर एक नवीन पेज तुम्हाला दिसेल. इथं सुरुवातीला तुमचा आधार नंबर दिसेल. त्यापुढे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. इथं एक लक्षात ठेवायचं ते म्हणजे तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे.
  • मोबाईल नंबर टाकला की पुढच्या Get OTP या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  • त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP म्हणजेच वन टाईम पासवर्ड पाठवला जाईल. म्हणजेच काही आकडे पाठवले जातील. ते तुम्हाला इथल्या OTP या रकान्यात टाकायचे आहेत.
  • मग पुढे असलेल्या Submit for Auth या रकान्यात क्लिक करायचं आहे.
  • त्यानंतर eKYC is Sucessfully Submitted असा मेसेज तिथं येईल. याचा अर्थ तुमची eKYC ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

हे पण वाचा : ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचे 2 हजार!

 

पण, इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे ही सेवा सरकारनं नुकतीच सुरू केली असल्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करताना तुम्हाला Record not found किंवा Invalid OTP यासारखे पर्याय येतील. त्यामुळे तुम्ही काही दिवसांनंतर किंवा मग सीएससी सेंटरवर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता.

source = bbc marathi

1 thought on “PM Kisan eKYC : पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी कशी करायची?”

  1. काही जण pm Kisan वर online payment करत आहेत ते काय आहे .
    E-kyc केलेल्यांना गरजेच नाही का

    Reply

Leave a Comment