ह्या योजनेतून मिळणार शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये पेन्शन ; असा भरा अर्ज

ह्या योजनेतून मिळणार शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये पेन्शन ; असा भरा अर्ज
२० लाख शेतकर्‍यांच्या खात्यात दरवर्षी जमा होणार ३६ हजार रुपये
मोदी सरकार आता देशातील 20 लाख 41 हजार शेतकर्‍यांना वर्षाकाठी सुमारे 36 हजार रुपये पेन्शन देईल. देशातील ही पहिली शेतकरी पेन्शन योजना म्हणजेच प्रधानमंत्री किसान समाज योजनेत बऱ्याच शेतकर्‍यांची नोंदणी झाली आहे. यात 6 लाख 38 हजाराहून अधिक महिलांचा समावेश आहे. केवळ शेतीवरच अवलंबून असणाऱ्या या शेतकर्‍यांना या योजनेचा चांगला उपयोग होत आहे. विशेषत: गरीब शेतकर्‍यांसाठी, ज्यांच्याकडे शेती शिवाय रोजीरोटीचे इतर कोणतेही साधन नाही.
या योजनेंतर्गत हरियाणाच्या साडेचार लाख शेतकर्‍यांनी नोंदणी केली आहे तर यामध्ये बिहार दुसर्‍या क्रमांकावर आहे, जिथे तीन लाख अन्नादाते आपली वृद्धावस्था सुरक्षित ठेवू इच्छितात. झारखंड आणि उत्तर प्रदेशात सुमारे अडीच लाख लोकांची नोंद झाली आहे. 26 ते 35 वय असलेल्या बहुतेक शेतकर्‍यांनी या पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेण्यात रस दर्शविला आहे.
किती पैसे खर्च करावे लागतील
शेतकरी पेन्शन योजना 18 ते 40 वर्षे वयोगटातील अल्प व सीमांतिक शेतकर्‍यांसाठी आहे. यासाठी फक्त 2 एकर शेती जमीन असावी.
– या योजनेत त्यांना किमान 20 वर्षे आणि जास्तीत जास्त 40 वर्षे 55 रुपये पासून ते 200 रुपये पर्यंत आंशिक मासिक देय द्यावं लागेल जे त्यांच्या वयावर अवलंबून असेल.
जर आपण वयाच्या 18 व्या वर्षी यात सामील झाला, तर मासिक योगदान हे 55 रुपये किंवा 660 रुपये वार्षिक असेल. त्याच बरोबर, जर आपण वयाच्या 40 व्या वर्षी सामील व्हाल तर आपल्याला दरमहा 200 रुपये किंवा 2400 रुपये वार्षिक द्यावे लागतील.
नोंदणी कशी होईल
या पंतप्रधान किसान पेन्शन योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकर्‍यांना कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) येथे जाऊन त्यांची नोंदणी करावी लागेल.
– याच्या नोंदणीसाठी आधार कार्ड, शेत जमिनीची कागदपत्रे, 2 छायाचित्रे आणि बँक पासबुक आवश्यक असेल.
– या नोंदणीसाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. शेतकरी पेन्शनचा यूनिक क्रमांक आणि पेन्शन कार्ड तयार केले जाईल.
निवृत्तीवेतनासाठी अटी लागू
राष्ट्रीय पेन्शन योजना, कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) योजना आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ) मध्ये सहभागी असणारे यासाठी पात्र असणार नाहीत.
– वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यावरच पेंशन म्हणून शेतकऱ्याला दरमहा 3000 रुपये मिळतील. पॉलिसीधारक शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला 50 टक्के मिळतील.
जर एखाद्या शेतकऱ्याला ही योजना मध्येच सोडायची असेल तर त्याचे पैसे तो गमावणार नाही. तो योजना सोडत नाही तोपर्यंत जमा झालेल्या पैसांवर त्याला, त्याला बँकांच्या बचत खात्याइतके व्याज मिळेल. ह्या योजनेतून
ref:- https://m.dailyhunt.in/

विशेष जाहिराती

नवीन जाहिराती

Leave a Comment