योजनेतील निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्येच, काय बदल केले आहेत मोदी सरकारने ?

योजनेतील निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्येच, काय बदल केले आहेत मोदी सरकारने ?

 
शेतकऱ्यांसाठी योजना तर अनेक राबवल्या जात होत्या मात्र, प्रत्यक्षात निधी जमा होताना त्यामध्ये मोठी तफावत असायची. दलालांच्या मध्यस्तीमुळे लाभार्थी हा वंचित राहत होता. नेमका याच बाबींवर लक्ष केंद्रीत करीत  मोदी सरकारने यंत्रणाच बदलून टाकली आहे. आतापर्यंत पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत 11 कोटी 50 लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये 1 लाख कोटी 62 हजार रुपये जमा करण्यात आले आहे. यामध्ये कोणताही मध्यस्ती केंद्र सरकारने ठेवला नसल्याचे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रिसंग तोमर यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वीचे सरकार मदतीची घोषणा करायचे पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना ती रक्कम मिळताना मोठी तफावत राहत असल्याचे ते म्हणाले.
विज्ञान भवनात डिपॉझिट अॅश्युरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनने (डीआयसीजीसी) च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान, तोमर यांनी मोदी सरकार सत्तेत आल्यापासून योजनांमध्ये किती तत्परता आली आहे हे पटवून दिले. मोदा सरकारने जनतेच्या हीताचे अनेक निर्णय घेतल्यामुळेच सर्वसामान्य नागरिकही योजनेचा लाभ घेऊ शकत आहे. मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी पन्नास टक्के नागरिकांचे खातेही बॅंकेत नव्हते. यामध्ये सुधारणा करुन आता सर्व जनतेला विकासाच्या प्रवाहात आणले असल्याचे तोमर यांनी सांगितले.

पीएम किसान सन्मान योजनेचा 10 हप्ता

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या 10 हप्त्याचा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. 15 डिसेंबर ते 25 डिसेंबरच्या दरम्यान ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आतापर्यंत देशात 11 कोटी 50 लाख शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळालेला आहे. योजनेत तत्परता यावी त्या अनुशंगाने केंद्र सरकारने पावले उचललेली आहेत. त्यामुळे जो लाभार्थी त्याच्याच खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार आहे.
हे पण वाचा:- 30 लाख शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे वाटप, राहिलेली रक्कम कधीपर्यंत होणार जमा?

बँक बुडीत निघाली तरी मिळणार 5 लाख रुपये

बॅंक ग्राहकांच्या ठेवीवर विमा ही योजना 60 व्या दशकात नावारुपाला आली होती. त्यावेळी बॅंकेत जमा केलेल्या रकमेपैकी केवळ 50 हजार रुपयांपर्यंतच हमी दिली जात होती. यामुळे सर्वसामान्य जनतेचे मोठे नुकसान होत होते. त्यानंतर ही रक्कम वाढवून 1 लाख पर्यंत करण्यात आली होती. मात्र, हे पैसे केव्हा मिळणार याबाबत कोणतेही तरतूद नव्हती. कोणतेही नियम हे ठरवून देण्यात आले नव्हते. त्यामुळे बॅंकेत पैसे ठेऊनही ग्राहकांच्या जीवाला घोर कायम होता. आता 1 लाख ऐवजी 5 लाखाची तरतूद केली असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले आहे.त्यामुळे बॅंक ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

90 दिवसांच्या आतमध्ये मिळणार रक्कम

बॅंक बुडीत निघाली तर पैसे मिळणार पण कधी? यासाठी कोणताही कायदा ठरविण्यात आला नव्हता. यामध्येही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता 90 दिवसांच्या आतमध्ये ही रक्कम देण्याचे निर्देश केंद्र सरकारने बॅंकांना दिलेले आहेत. म्हणजेच 3 महिन्यांच्या आतमध्ये ही रक्कम संबंधित ग्राहकांना मिळणार आहे. एवढेच नाही तर गेल्या काही दिवसांपासून रखडलेले पैसे हे ठेवीदारांना काही दिवसांपूर्वीच परत मिळालेले आहेत. ही रक्कम जवळपास 1300 कोटींच्या घरात असल्याचे सांगण्यात आले आहे.
source:– tv9 marathi

1 thought on “योजनेतील निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्येच, काय बदल केले आहेत मोदी सरकारने ?”

  1. पी एम किसान योजना ही शेतकऱ्यासाठी योग्य आहे परंतु खत बियाणे दर वाढीवर नियंत्रण नसले मुळे शेतकरी उत्पादन खर्च पेक्षा कमी उत्पादन कमी मिळत असल्यामुळे अडचणीत सापडला तुटपुंजी मदत करणे पेक्षा भरीव मदत करणे गरजेचे आहे.काही काळ शेतकरी नुकसानीत शेती व्यवसाय करतील परंतु जास्त प्रमाणात उत्पादन न करता कमी उत्पादन कमी खर्च करून जर केले तर राष्ट्रीय उत्पादन कमी होऊन देश्याची आर्थिक परस्थिती आयात निर्यात समतोल राहणार नाही.याचा ही विचार केंद्र सरकारने करावे केवळ धार्मिक भावना लक्षात घेऊन राष्ट्रीय संपत्ती सध्या तरी बचत करून देष्याची आर्थिक बाजू भक्कम केली तर दीर्घ काळ उपयुक्त होईल.

    Reply

Leave a Comment