PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा

 
मोदी सरकारने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी पीएम किसान योजना सुरु केली. यामुळे अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळतात. आतापर्यंत या योजनेचे १० हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. आता शेतकऱ्यांना 11 व्या हप्त्याचे वेध लागले होते. चालू आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 हजार रुपये जमा होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारने अक्षय तृतीयाचे मुहूर्त साधल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर ही रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. पीएम किसान ही देशातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी योजना आहे.
वर्षभरात शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. त्याअनुशंगाने आतापर्यंत 11 कोटी शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी झाली आहे. 11 व्या हप्त्यासाठी 22 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे लागणार आहेत.
आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र शेतकर्‍यांना प्रत्येकी वीस हजार अर्थात 10 हप्ते देण्यात आले आहेत. देशातील एकूण अकरा कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे राज्यातील देखील एक कोटी पाच लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.
हे पण वाचा : ई-केवायसी नाही केली तर मिळणार का पीएम किसान योजनेचा 11वा हफ्ता
या योजनेचा 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. वर्षाकाठी 6 हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात. योजनेचे हे 6 वे वर्ष आहे.
source : krishi jagran

Leave a Comment