Pm kisan yojana : ‘ही’ प्रक्रिया पूर्ण केल्यावरच तुमच्या खात्यावर जमा होणार पीएम किसान चा १२ व हफ्ता

Pm kisan yojana : ‘ही’ प्रक्रिया पूर्ण केल्यावरच तुमच्या खात्यावर जमा होणार पीएम किसान चा १२ व हफ्ता

 

देशातील 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी  केंद्र सरकारच्या  पीएम किसान योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेचा 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमाही झाला आहे. आता शेतकऱ्यांना वेध लागले आहेत आहेत ते 12 व्या हप्त्याचे. सरकारने निर्धारित केलेल्या वेळेत हा हप्ताही शेतकऱ्यांच्या खत्यावर जमा होणार आहे. पण त्यापूर्वी शेतकऱ्यांना  ‘ई-केवायसी’ ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. तरच 2 हजार रुपयांचा हप्ता खात्यावर जमा होणार आहे. केंद्राने याबाबत सातत्याने जनजागृती केली असून मुदतही दोन वेळा वाढवून दिली आहे. आता शेतकऱ्यांना ही प्रक्रिया 31 जुलैपर्यंत पूर्ण करावी लागणार असून शेतकऱ्यांनी ई-केवायसी हे अपडेट किंवा नव्याने नाही केले तर शेतकऱ्यांना 12 हप्त्याला मुकावे लागणार आहे.

दोन वेळेस मुदत वाढ

‘ई-केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. स्थानिक पातळीवरील शेतकऱ्यांच्या अडचणी पाहून हा निर्णय केंद्र सरकारने घेतला आता. आता 31 जुलै ही तारिख ठरवून देण्यात आली आहे. त्यामुळे आता मुदतवाढ मिळणार की नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वीच ही प्रक्रिया करणे महत्वाचे आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यावरच शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. pm kisan.gov.in या केंद्राच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातूनही ई-केवायसी करता येणार आहे.

हे पण वाचा:- Punjab dakh havaman andaj : राज्यात आज पासून 19 तारखे पर्यंत ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

12 वा हप्ता केव्हा होणार जमा?

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा या योजनेचे पैसे थेट खात्यामध्ये जमा केले जातात. यामध्ये 1 एप्रिल ते 31 जुलैच्या दरम्यान पहिला हप्ता, 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरच्या दरम्यान दुसरा हप्ता तर तिसरा हप्ता हा 31 डिसेंबरपर्यंत जमा केला जातो. त्यानुसार आता बारावा हप्ता हा ऑगस्ट ते सप्टेंबरच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यापूर्वीच शेतकऱ्यांना ‘ई-केवायसी’ ची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

source:- tv9 marathi