PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेतून हे शेतकरी बाद, मिळणार नाहीत पुढील हप्ते!

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेतून हे शेतकरी बाद, मिळणार नाहीत पुढील हप्ते!

 

देशातील अल्पभूधारक शेतकरी आर्थिक संकटात सापडू नये यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या जातात. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यामधून शेतकऱ्यांना एका वर्षात ६००० हजार रुपये दिले जातात. हे पैसे दर ४ महिन्यांनी २००० हजार रुपयांच्या हफ्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जातात.

या योजनेंतर्गत आतापर्यंत कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 11 हप्ते जमा करण्यात आले आहेत. तसेच लवकरच या शेतकऱ्यांना 12व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. नवीन माहितीनुसार, पीएम किसानचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य आहे, यासाठी 31 जुलैची अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे.

जे शेतकरी ई-केवायसी करणार नाहीत, त्यांच्या खात्यावर पीएम किसानचा 12 वा हप्ता पोहोचू शकणार नाही. दरम्यान, पंतप्रधान किसान योजनेतून कोणते शेतकरी वगळले जाऊ शकतात किंवा कोणते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

पीएम किसानचे गैर लाभार्थी शेतकरी!

जे शेतकरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांना केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी स्वत:ची जमीन आणि भारताचे नागरिकत्व असणे बंधनकारक असले तरी जे शेतकरी पात्रतेबाहेर आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान योजनेचा बेकायदेशीरपणे लाभ घेतला आहे, त्यांनाही सरकारकडून नोटीस बजावून पैसे वसूल केले जातील.

हे पण वाचा : राज्यात या जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा!

भाडेतत्वावर शेती करणाऱ्यांना नाही मिळणार लाभ!

ज्या शेतकऱ्यांकडे २ हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे किंवा नंतर त्यांनी आपली जमीन वाढवली आहे, ते शेतकरीही या योजनेतून बाहेर पडू शकतात. प्राप्तिकर भरणारे आणि मासिक 10,000 रुपये किंवा त्याहून अधिक पेन्शन घेणारे शेतकरी देखील पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. केंद्र किंवा राज्य सरकारच्या कार्यालयात किंवा विभागात कार्यरत कर्मचारी, शेतकरी, सेवानिवृत्त कर्मचारी किंवा सरकारी पेन्शनधारकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

मात्र, सरकारी कार्यालये आणि विभागांमध्ये काम करणाऱ्या मल्टी टास्किंग आणि ग्रुप डी कर्मचाऱ्यांना या योजनेशी जोडण्यात आले आहे. शेतकरी कुटुंबे ज्यांच्या सदस्यांकडे कोणतेही घटनात्मक पद आहे जसे की माजी किंवा वर्तमान केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, लोकसभा-राज्यसभेचे सदस्य, राज्य विधानसभेचे माजी आणि नवीन सदस्य, शहर महापालिकेचे माजी किंवा नवे महापौर, जिल्हा पंचायतींचे माजी आणि नवे अध्यक्ष इत्यादींनाही पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही.

source : krushi jagran marathi