PM kisan yojana : पीएम किसान योजनेच्या e-kyc ची या तारखेपर्यंत मुदत वाढ

PM kisan yojana : पीएम किसान योजनेच्या e-kyc ची या तारखेपर्यंत मुदत वाढ

 

पंतप्रधान किसान सन्मान निधीचा ११ व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच ई-केवायसी करताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे सरकारने पुन्हा मुदत वाढवली आहे. आता शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत ई-केवायसी करता येईल.

पंतप्रधान किसान सन्मान निधी अर्थात पीएम-किसानचा लाभ अपात्र शेतकऱ्यांनीही घेतला. त्यामुळे केंद्राने या शेतकऱ्यांना निधी परत करण्यास सांगितले. तसेच पात्र शेतकऱ्यांनाच लाभ विळावा यासाठी सरकारने आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक केले आहे. शेतकऱ्यांना आत्तापर्यंत १० वा हप्ता देण्यात आला. मात्र ११ व्या हप्त्यासाठी आधार प्रमाणीकरण बंधनकारक केले. परंतु देशभरात आधार प्रमाणीकरण न केलेल्या शेतकऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे सरकारने ३१ मे पर्यंत मुदत दिली होती. ती वाढवून ३० जूनपर्यंत वाढविली. तरीही पूर्ण शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करता आले नाही. त्यामुळे केंद्राने पुन्हा मुदतवाढ दिली आहे. शेतकऱ्यांना आता ३१ जुलैपर्यंत आधार प्रमाणीकरण करता येईल.

हे वाचा : पंजाब डख यांनी केला जुलै महिण्याचा हवामान अंदाज जाहीर

केंद्राने शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये आर्थिक मदत करण्याचा निर्णय २०१८ मध्ये जाहीर केला. यात पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांत मदत मिळणार आहे. केंद्राने आत्तापर्यंत १० हप्ते शेतकऱ्यांना दिले. दहावा हप्ता देशभरातील ११ कोटी १४ लाख शेतकऱ्यांना दिला. तर सध्या ११ वा हप्ता वितरणाचे काम सुरु आहे. मात्र आधार प्रमाणीकरण केल्याशिवाय ११ हप्ता मिळणार नाही, असे सरकारने जाहिर केले. आत्तापर्यंत १० कोटी ७४ लाख शेतकऱ्यांना ११ व्या हप्त्याचे वितरण केले. ई-केवायसी झालेल्या शेतकऱ्यांना ११ वा हप्ता मिळत आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांना ई-केवायसी मिळावी यासाठी सरकारने ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

source: agrowon