Pm kisan: योजनेचे लाभार्थी शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबीय कसा घेऊ शकतात लाभ

Pm kisan: योजनेचे लाभार्थी शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबीय कसा घेऊ शकतात लाभ
 
आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Scheme) या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून दिले जातात. केंद्र सरकारची ही महत्वकांक्षी योजना  अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी फार महत्वाचे अशी योजना आहे. भारतात या योजनेचा लाभ घेणाऱ्या  शेतकर्‍यांची संख्या फार मोठी आहे. परंतु या योजनेबद्दल तुम्हाला एक महत्वाचे वैशिष्ट्य माहित नसेल ते म्हणजे लाभार्थी शेतकर्‍याच्या मृत्यूनंतर संबंधित लाभार्थ्यांचा वारस या योजनेचा लाभ घेऊ शकतो आणि हे खरं  आहे.
संबंधित लाभार्थ्यांच्या वारसांना  याचा लाभ मिळू शकतो परंतु त्यासाठी काय नियम लागू करण्यात आले आहेत व ते पाळणे तितकेच  महत्त्वाचे असते. या लेखामध्ये आपण लाभार्थी शेतकर्‍याच्या मृत्यूनंतर शेतकऱ्याच्या वारसांना लाभ कसा मिळतो हे जाणून घेणार आहोत.
जर लाभार्थी शेतकऱ्याचा मृत्यू झा झाला तर संबंधित शेतकऱ्यांच्या वारसाला पी एम किसान पोर्टल वर स्वतःचे पुन्हा रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यानंतर कार्यप्रणालीप्रमाणे लाभार्थ्याच्या  वारसाची चौकशी केली जाते. या चौकशीमध्ये संबंधित लाभार्थी हा योजनेचा लाभ घेण्यासाठी वैध आहे किंवा नाही याची माहिती घेतली जाते. ही सगळी प्रक्रिया  पी एम किसान पोर्टल वर नियमात राहून केली जाते. जर चौकशीत लाभार्थी द्वारे दिली गेलेली माहिती योग्य असेल तर योजनेप्रमाणे वार्षिक सहा हजार रुपये मिळणे सुरू होऊन जाते.

या योजनेचा फायदा कुणाला मिळत नाही

केंद्र सरकार ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांना सरकारकडून दहा हजार रुपयांपर्यंतचे पेन्शन मिळते किंवा कुठल्याही सरकारी पदावर कार्यरत आहेत किंवा एखाद्या  राजकीय पदावर आहेत तसेच डॉक्टर,  वकील इत्यादी ना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. या योजनेचा लाभ फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांना होतो.
संदर्भ:- कृषी जागरण
 
“हे पण वाचा:- किसान-क्रेडिट कार्ड प्रक्रिया आणखी सोपी, (KYC) बाबत मोठा निर्णय काय आहे निर्णय वाचा सविस्तर”

 
मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे माहिती मोफत मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 
https://www.krushikranti.com/whatsapp-groups/
 

Leave a Comment