पीएम किसान योजनेचा ८ वा हप्ता आला, अशी पहा गावातील शेतकऱ्यांची यादी !

पीएम किसान योजनेचा ८ वा हप्ता आला, अशी पहा गावातील शेतकऱ्यांची यादी !

 
नवी दिल्ली : पीएम किसान योजनेच्या अंतर्गत आज देशभरातील 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत योजनेचा ८ वा हप्ता आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला. यावेळी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, काही राज्यांचे मुख्यमंत्री आणि काही खासदार या कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी देशवासियांना ईद आणि अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा दिल्या.
 

बंगालच्या शेतकऱ्यांना पहिल्यांदाच या योजनेचा लाभ pm kisan list

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “कोरोना काळात देशातील शेतकऱ्यांनी आपले कर्तव्य पार पाडले आणि अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन घेतले. बंगालच्या लाखो शेतकऱ्यांना आज पहिल्यांदाच या योजनेचा लाभ मिळत असून आज त्यांच्या खात्यावर पहिला हप्ता जमा होत आहे. ज्या प्रमाणे राज्याकडून शेतकऱ्यांच्या नावाची यादी केंद्र सरकारला पाठवली जाईल त्याप्रमाणे या संख्येत भर पडेल.”
पंतप्रधानांनी सांगितलं की, “कोरोना काळात भारतात जगातील सर्वात मोठी मोफत धान्यांची योजना सुरु करण्यात आली होती. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत गेल्या वर्षी 8 महिने गरीबांना मोफत धान्य वाटप करण्यात आलं होतं. या वर्षी मे आणि जूनमध्ये देशातील 80 कोटीपेक्षा जास्त लोकांना मोफत धान्य देण्याचे नियोजन केलं आहे.”
 

हे पण वाचा :- महाराष्ट्राला चक्रीवादळाचा धोका

पंतप्रधान किसान योजनेच्या अंतर्गत लाभार्थी शेतकरी परिवाराला प्रत्येक वर्षी 6000 रुपये दिले जातात. हे 6000 रुपये तीन हप्त्यात शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केले जातात. आतापर्यंत एकूण रक्कमेचा विचार करता 1.5 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना 8 हप्त्यांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.
 
खालील लिंक वर जाऊन बघा आपल्या गावाची यादी  
आपल्या राज्याचे नाव सिलेक्ट करून जिल्हा व तालुका सिलेक्ट करावा, त्यानंतर आपले गाव सिलेक्ट केले की पूर्ण गावातील शेतकरी बांधवांची यादी आपणास खालील लिंकवर पहायला मिळेल.

 
यादीमध्ये नाव नसल्यास अशी तक्रार नोंदवा
जर आपण नोंदणी केली असेल आणि लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आपले नाव दिसत नसेल तर आपण पीएम किसान वेबसाइटच्या हेल्पलाइन नंबरवर आपली तक्रार नोंदवू शकता.
-पीएम किसान हेल्पलाईन क्रमांक 155261 आहे
-पंतप्रधान किसान टोल फ्री क्रमांक- 1800115526
-पीएम किसान लँडलाईन क्रमांक आहे – 011-23381092, 23382401
-याशिवाय ई-मेलद्वारे तक्रार करून तुम्ही pmkisan-ict@gov.in या ई-मेल आयडीवरही काम करू शकता.
 
मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे माहिती मोफत मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 
https://www.krushikranti.com/whatsapp-groups/
 
आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

2 thoughts on “पीएम किसान योजनेचा ८ वा हप्ता आला, अशी पहा गावातील शेतकऱ्यांची यादी !”

Leave a Comment