पीएम किसान योजनेचा 10 वा हप्ता आला, अशी पहा गावातील शेतकऱ्यांची यादी !

पीएम किसान योजनेचा 10 वा हप्ता आला, अशी पहा गावातील शेतकऱ्यांची यादी !

youtube
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 10 व्या हप्त्याचे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. देशभरातील 10 कोटी 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. मात्र, असे असले तरी अनेक शेतकऱ्यांना ही रक्कम खात्यावर जमा होणार की नाही याबाबत संभ्रमता कायम आहे. कारण योजनेमध्ये नियमितता आणण्यासाठी मध्यंतरी अनेक शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली आहेत. मात्र, असे असले तरी शेकऱ्यांना ही रक्कम जमा झाली की नाही याची माहिती एका क्लिकवर होणार आहे. यामध्ये जर ऑनलाईन नोंदणी केली नसेल तर शेतकऱ्यांना त्वरीत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. मात्र, 10 हप्ता आता जमा करण्यात आला असून यादीत नाव तपासणी करणे आवश्यक आहे.

योजनेच्या यादीमध्ये असे नाव तपासा

किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अर्ज केला असेल तर आता तुम्ही तुमचे नाव पीएम-किसान योजना लाभार्थी यादीमध्ये ऑनलाइन पाहू शकता. तुम्हाला फक्त तुमचे आधार कार्ड लागणार आहे.
सर्वप्रथम पात्र शेतकऱ्यांना PM KISAN पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. https://pmkisan.gov.in/.
त्यानंतर मुख्य मेनूतील ‘Farmers Corner’’ पर्याय निवडा लागणार आहे.
आता तुम्हाला खालील पर्याय समोर राहणार आहेत. यामध्ये
-New Farmer Registration
-Edit Aadhar Failure Record
-Beneficiary Status
-Beneficiary List
-Status of Self Registered/CSC Farmer
-Download PM-Kisan Mobile App
या पर्यायांमधून Beneficiary List पर्यायात क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमची संबंधित राज्य, जिल्हा, तहसील, महसूल मंडळ आणि तुमचे गाव निवडावे लागेल. शेवटी ‘Get Report’ बटणात क्लिक करून आपल्या क्षेत्राच्या किसान सन्मान निधी योजना यादीमध्ये (PM KISAN YOJANA)या यादीमध्ये आपले नाव शोधावे लागणार आहे. यादीत तुमचे नाव समाविष्ट झाले तर या योजनेअंतर्गत तुम्हाला हप्त्याचा लाभ मिळेल.
हे पण वाचा:सोयापेंडीवर स्टॉक लिमिट लावल्यानं सोयाबीनचे दर कोसळणार?

यादीत नाव नसेल तर काय?

ही रक्कम केवळ पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना दिली जाते. जर तुमचा अर्ज अद्याप झाला नसेल, तर योजनेच्या https://www.pmkisan.gov.in अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकता. या माध्यमातून नोंदणी करता येणार आहे.

अर्ज नोंदणीसाठी अटी-नियम

देशातील लहान आणि सीमांत शेतकरीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
याकरिता केवळ 2 हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन असावी लागते. लाभार्थी शेतकऱ्याकडे शेतजमिनीची कागदपत्रे असणे आवश्यक आहे. अर्जामध्ये ओळखपत्र पुरावा म्हणून आधार कार्ड, बँक खाते पासबुक सारखी महत्त्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे जे त्यांच्या आधार कार्डशी लिंक असलेले पाहिजे.

पंतप्रधान-किसान नोंदणी

अर्जदार शेतकऱ्याची या योजनेअंतर्गत दोन प्रकारे नोंदणी केली जाऊ शकते: ऑनलाइन किंवा ऑफलाइन. ऑफलाइन अर्जासाठी शेतकऱ्यांना जवळच्या सीएससी सेंटरमध्ये जावे लागणार आहे. त्यावर आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर करून या योजनेअंतर्गत नोंदणी करावी लागते. ऑनलाइन अर्जासाठी पात्र शेतकरी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन pmkisan.gov.in अधिकृत वेबसाइटवर जाऊन ‘नवीन शेतकरी नोंदणी’ करावी लागेल. ऑनलाइन अर्ज करताना, आपल्याला आपली कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करावी लागतील याची खात्री करा. अशा प्रकारे तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेवर अर्ज करू शकता.
मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा
https://contact.krushikranti.com/
source:- tv9 marathi

Leave a Comment