PM Kisan Yojna : पीएम किसान योजनेमध्ये झालेले बदल…!

PM Kisan Yojna : पीएम किसान योजनेमध्ये झालेले बदल…!

 
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना घेउन येत असतात. ‘पीएम किसान सन्मान निधी’ ही देखील यातीलच एक योजना आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून चार महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये पाठवले जातात. म्हणजेच शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये या योजनेंतर्गत देण्यात येतात. केंद्र सरकार लवकरच पीएम किसान सन्मान निधीचा 2000 रुपयांचा अकरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. दहाव्या हप्त्याचे पैसे 1 जानेवारी 2022 रोजी शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे.

ई-केवायसी अवश्‍य करा

दरम्यान, योजनेची रक्कम पाठवण्यापूर्वी केंद्र सरकारने योजनेत काही मोठे बदल केले आहे. त्यानंतरच शेतकऱ्यांना योजनेंतर्गत 2000 रुपयांचा निधी मिळू शकणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नसेल, असे शेतकरी योजनेतील अकराव्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात. शेतकऱ्यांना वाढीव मुदत देण्यासाठी सरकारने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तारीख वाढवली आहे. नवीन माहितीनुसार, आता ही प्रक्रिया 22 मे 2022 पर्यंत पूर्ण करणे अपेक्षीत आहे.
हे पण वाचा : आता फरदड कापसाचाही तोरा कायम..!

आता जाणून घ्या हप्त्यांची स्थिती

केंद्र सरकारने पीएम किसान योजनेअंतर्गत हप्त्याची स्थिती तपासण्यासाठी आपल्या सुविधांमध्येही बदल केला आहे. आता हप्त्याची स्थिती तपासण्यासाठी पीएम किसान खात्यावर नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकावा लागणार आहे. याशिवाय या योजनेसाठी शिधापत्रिका क्रमांक देणेही बंधनकारक करण्यात आले आहे. यासोबतच शिधापत्रिकेची पीडीएफ प्रत तयार करून ती ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक करण्यात आले आहे.
source : tv9marathi

Leave a Comment