पोखरा योजनेमध्ये मिळते शेडनेट हाऊस व हरितगृह अनुदान, जाणून घ्या अनुदानाची प्रक्रिया

पोखरा योजनेमध्ये मिळते शेडनेट हाऊस व हरितगृह अनुदान, जाणून घ्या अनुदानाची प्रक्रिया

 
भारतात फळ उत्पादन आणि भाजीपाला या पिकांसाठी शेडनेट हाऊस व हरितगृह यांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.यामध्येफळपिकांची, फुल पिकांची लागवड केली तर तसेच विविध प्रकारचे भाजीपाला पीक घेतल्यानेगुणवत्तापूर्ण उत्पादन होते. तसेच शेडनेट हाऊस मध्ये  रोपवाटिका व्यवसाय सुद्धा यशस्वी रित्या करता येतो.
या शेडनेट आणि हरितगृह यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचे उत्पादन घेऊ शेतकऱ्यांना चांगला नफा मिळावा या उद्देशाने पोखरा अंतर्गत शेडनेट हाऊस, हरितगृह व प्लॅस्टिक टनेल साहित्य व मशागत याकरता शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येते. पोखरा अंतर्गत मिळणाऱ्या या अनुदाना बद्दल या लेखात माहिती घेऊ.

या योजनेची उद्दिष्टे काय आहेत?

  • या योजनेचे महत्वाचे उद्दिष्ट म्हणजे उच्च तंत्रज्ञान वापरून बिगर हंगामी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे हे आहे.
  • अल्पभूधारक शेतकऱ्यांना बदललेल्या नैसर्गिक हवामानाचा व त्या अनुषंगाने उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतकऱ्यांना सक्षम बनवणे.
  • तसेच या योजनेच्या माध्यमातून उच्च प्रतीच्या निर्यातक्षम आणि उच्च दर्जाच्या पिकांच्या लागवडीसाठी अर्थसाहाय्य करणे.
  • तसेच या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांना कृषी क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देणे.

या योजने साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचा सातबारा उतारा
  • अनुसूचित जाती जमाती असल्यास संबंधित जातीचे प्रमाणपत्र
  • अर्जदाराचे आठ अ प्रमाणपत्र

 या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता

  • ज्या शेतकऱ्यांची एकूण जमीन धारणा क्षेत्र दोन हेक्‍टरपर्यंत आहे असे शेतकरी या घटकांतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र असेल.
  • अल्प,अत्यल्पभूधारक, अनुसूचित जाती आणि जमातीच्या महिला, दिव्यांग व इतर शेतकऱ्यांना प्राधान्य अनुसार लाभ देण्यात येईल.
  • पुर्वी सदर घटकांतर्गत जर शासनाच्या योजनेअंतर्गत लाभ घेतला असल्यास एकत्रित लाभ 40गुंठ्याच्यामर्यादित घेता येईल.

हे पण वाचा:- सोयाबीन पिकाची काढणी, मळणी व साठवण तंत्र 2021

या योजनेसाठी अर्ज कुठे करावा?

शेतकऱ्यांनी https://dbt.mahapocra.gov.inया संकेतस्थळावर अर्ज करावाकिंवा डीबीटी ॲप वर ऑनलाईन नोंदणी करून अर्ज करावा व त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे.
संदर्भ:- कृषी जागरण

Leave a Comment