राष्ट्रीय खाद्य तेल मिशन योजना जाहीर वाचा सविस्तर माहिती

राष्ट्रीय खाद्य तेल मिशन योजना जाहीर वाचा सविस्तर माहिती 

 

खाद्यतेलात आत्मनिर्भर करण्याचं आवाहन

खाद्यतेलात आपला देश आत्मनिर्भर व्हावा, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना (Farmers) केलं आहे. खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भरते साठी राष्ट्रीय खाद्यतेल मिशन योजना सुरु करण्यात येत आहे. आपला देश भारत छोडो आंदोलनाचं स्मरण करत आहेत.  या मिशनच्या माध्यमातून 11 हजार कोटींची गुंतवणूक केली जाईल. शेतकऱ्यांनी बियाण्यापासून, उत्तम तंत्रज्ञान पुरवण्यात येईल. पारंपारिक तेलबियांच्या शेतीला प्रोत्साहन दिलं जाईल. कृषी मालाच्या निर्यातीत भारत पहिल्या 10 मध्ये पोहोचला आहे. भारताची ओळख कृषी निर्यातदार म्हणून आहे. त्यामुळे खाद्यतेल आयातीवर अवलंबून राहणं योग्य नाही.

रोजगाराच्या संधी वाढतील

खाद्यतेलाच्या आयातीमध्ये 55 टक्के पामतेल आयात करावी लागत आहे. भारतात पामतेल शेती करण्यासाठी उत्तर पूर्व आणि अंदमान निकोबरामध्ये ही शेती वाढवली जाऊ शकते. त्या भागात पामची शेती करता येऊ शकते. खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भरतेचं मिशन महत्वाचं आहे. हे गरीब शेतकरी, मध्यम वर्गासाठी महत्वाचं आहे. याशिवाय, रोजगाराच्या संधी वाढतील. अन्न प्रक्रिया व्यवसायामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल, असं मोदी म्हणाले.
हे पण वाचा:- PM Kisan Scheme : पीएम किसानचा 9 वा हप्ता जारी !

उत्तर पूर्व भारत आणि अंदमान निकोबार मध्ये पामशेती शक्य

खाद्यतेलाच्या आयातीमध्ये 55 टक्के पामतेल आयात करावी लागत आहे. भारतात पामतेल शेती करण्यासाठी उत्तर पूर्व आणि अंदमान निकोबरामध्ये ही शेती वाढवली जाऊ शकते. त्या भागात पामची शेती करता येऊ शकते. खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भरतेचं मिशन महत्वाचं आहे. हे गरीब शेतकरी, मध्यम वर्गासाठी महत्वाचं आहे. याशिवाय, रोजगाराच्या संधी वाढतील. अन्न प्रक्रिया व्यवसायामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल, असं नरेंद्र मोदी म्हणाले
मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा
टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 
https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

Leave a Comment