‘MahaDBT’ वर बियाण्यांचा देखील समावेश, शेतकऱ्यांना अर्ज कधी पर्यंत करता येईल ?

‘MahaDBT’ वर बियाण्यांचा देखील समावेश, शेतकऱ्यांना अर्ज कधी पर्यंत करता येईल ?

 
पुणे : राज्य शासनाने महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलमध्ये आता बियाण्यांचा देखील समावेश केला आहे. त्यामुळे अनुदानाचा लाभ घेण्यासाठी येत्या १५ मे पर्यंत शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करता येतील, असे कृषी आयुक्तालयाने म्हटले आहे.
 
‘अर्ज एक शेतकरी अनेक’ या हेतूने महाडीबीटीची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे विविध योजना एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यात आता बियाणे घटकाचाही समावेश करण्यात आल्याने सोयाबीन, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी बियाणे अनुदानावर मिळू शकेल. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून ही सुविधा मिळणार आहे, असे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
 
बियाणे मिळण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतःचा मोबाईल, लॅपटॉप किंवा गावातील सामुदायिक सेवा केंद्र अथवा ग्रामपंचायतीच्या संग्राम केंद्राची मदत घेता येईल. त्यासाठी mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शेतकरी योजना, असा पर्याय आधी निवडावा लागेल. पोर्टलवर विविध माहिती भरल्यानंतर अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे. प्रमाणित बियाण्यासाठी दोन हेक्टरपर्यंत एका शेतकऱ्याला लाभ मिळू शकेल.
 
शेतकऱ्यांना या संदर्भात कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या मेलवर किंवा ०२०-२५५११४७९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक आधी महाडीबीटीच्या संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागणार आहे.
 
असे मिळणार अनुदान
गळीतधान्य विकास योजनेतून सोयाबीनसाठी बियाण्याच्या किमतीच्या ५० टक्के किंवा १२०० रुपये प्रतिक्विंटल यापैकी कमी असेल त्याप्रमाणे अनुदान मिळणार आहे. तीळ बियाण्यावर मात्र अनुदानाची रक्कम आठ हजार रुपयांपर्यंत राहील.
संदर्भ :- agrowon.com
 
आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

1 thought on “‘MahaDBT’ वर बियाण्यांचा देखील समावेश, शेतकऱ्यांना अर्ज कधी पर्यंत करता येईल ?”

Leave a Comment