Seeds : शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकार आक्रमक; तब्ब्ल 2 कोटींचे बियाणे जप्त!

Seeds : शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकार आक्रमक; तब्ब्ल 2 कोटींचे बियाणे जप्त!

 

बऱ्याचदा काळजी घेऊन देखील शेतातील उत्पादनात घट होते. घट होण्यापाठीमागे बरीच कारणे असतात. सध्या शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा वापर चांगलाच महागात पडला आहे. बोगस बियाणे वापरल्यामुळे बऱ्याच नुकसानीला शेतकरी सामोरे जात आहेत. बोगस बियाणांमुळे त्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने देखील बोगस बियाणे विकणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना जारी केल्या.

खत-बियाणांबाबत अनियमितता

सातारा जिल्ह्यातदेखील खते व बियाणांचा होत असलेला काळाबाजार रोखण्यासाठी 12 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. कृषी विभागाने भरारी पथकांची नेमणूक केली आहे. खरीब हंगाम सुरु होण्यापूर्वीच जिल्ह्यातील खत-बियाणांबाबत अनियमितता आढळून आल्यामुळे या पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारची अनियमितता वाढू नये यासाठी कृषी विभागाकडून काळजी घेतली जात आहे. हंगाम सुरु होण्यापूर्वीच खताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो अशी अफवा पसरवली जात आहे तसेच तुटवडा निर्माण झाल्यास खतांच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकेल असे चित्र निर्माण केले जात आहे.

या प्रक्रियेवर निर्बंध घालण्यासाठी भरारी पथक तैनात करण्यात आले आहे. या पथकाने आतापर्यंत खते, बि-बियाणे तसेच औषधे अशी 1 हजार 10 दुकानांची तपासणी केली आहे. नियमांचे उल्लंघन करुन बियाणांची विक्री करणे तसेच बियाणे कंपनीने कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे 12 खते दुकाने व 2 किटकनाशक दुकानाचा विक्री परवाना रद्द करण्यात आला आहे. तब्ब्ल 2 कोटीचे बियाणे जप्त करण्यात आले आहे. सध्या या बियाणांची तपासणी सुरू आहे.

शेतकऱ्यांची होत असलेली बियाणांबाबत फसवणूक रोखण्यासाठी तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी, वजने मापे निरीक्षक, कृषी अधिकारी पंचायत तर जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी, कृषी उपसंचालक, मोहीम अधिकारी, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक तसेच वजने मापे निरीक्षकांचा यात समावेश आहे. जि. प. चे कृषी विकास अधिकारी विजय माईनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 भरारी पथके कृषी निगडीत असणारी खते, बि-बियाणे, तसेच किटकनाशक दुकानांची तपासणी करणार आहे.

हे पण वाचा : माॅन्सून पुण्यापर्यंत दाखल!

यामध्ये 108 बियाणांचे तर 77 खतांचे आणि 39 किटकनाशकांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. शासकीय प्रयोगशाळा पुणे मध्ये बियाणांचे आणि किटकनाशकांचे नमुने पाठवण्यात आले तर शासकीय प्रयोगशाळा कोल्हापूर येथे खताचे नमुने पाठवण्यात आले होते. पाठवलेल्या नमुन्यांपैकी बियाणांचे 7, खताचे 9 आणि किटकनाशकांचे 5 नमुने अप्रमाणीत असल्याचे सापडले. आता संबंधित कंपन्यांना तसेच खत, बियाणे व किटकनाशकांची विक्रेती करणाऱ्यांना कारणे दाखवा अशी नोटीस बजावण्यात आली आहे. यातील एक परवाना तर कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे असं विजय माईनकर यांनी सांगितले.

source : krushijagran