शेळीपालन – निवड आणि जोपासना

शेळीपालन – निवड आणि जोपासना

शेळीपालन व्यवसायाचे यश हे शेळ्यांची निवड आणि जोपासना यावर अवलंबून असते.आपण चांगले उत्पन्न देणाऱ्या सशक्त आणि निरोगी शेळ्यांची निवड कशी करावी तसेच त्यांची काळजी कशी करावी या लेखात जाणून घेऊ !

शेळीपालन – निवड 

शेळ्या आणि बोकडांची निवड

शेळीपालनाचे यश पैदाशीसाठी वापरलेली शेळी व बोकड यांवर अवलंबून आहे, म्हणून उत्पादनाच्या उद्दिष्टांसाठी योग्य शेळी व बोकडांची निवड करावी.
शेळ्या आणि बोकडांची निवड शेळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खरेदी कराव्यात.
एकदा वेत झालेली (व्यायलेली) शेळी विकत घेणे चांगले असते.
तिची आई जुळी करडे देणारी शेळी मिळत असेल, तर अशा शेळीची पैदास विकत घेणे चांगले असते.
दुभती शेळी निवडताना तिचे वय, करडांची संख्या, दुधाचे प्रमाण इत्यादी गोष्टींकडे लक्ष द्यावे.
दुभती शेळी लठ्ठ व मंद नसावी, टवटवीत व चपळ असावी.
शेळी आकाराने मोठी असावी. तिची मान लांब असावी. तोंडापासून शेपटीपर्यंत असणारा लांबपणा हेही महत्त्वाचे लक्षण आहे.
केस मऊ व चमकदार दिसणारे असावेत. भरपूर छाती असावी. बांधा मोठा असावा, जेणेकरून दोन किंवा अधिक करडांना शेळी आपल्या गर्भाशयात जोपासू शकेल.
शेळीचे सर्व दात बळकट व सुस्थितीत असावेत.
शक्यतो एक ते दोन वर्षे वयाचीच (दोन ते चार दाती) शेळी विकत घ्यावी.
पाय सरळ, पिळदार व खूर (टाचा) उंच असावेत. शेळी विकत घेताना तिची कास नीट पारखून घ्यावी.
तिला कासदाह तर नाही ना, याची तपासणी करावी.
दुभत्या शेळीची धार काढून पाहावी. दुधाचे प्रमाण, दुधाचा रंग, कासेवर सूज या गोष्टी पारखून घ्याव्यात. निरोगी व भरपूर दूध देणाऱ्या शेळीचे करडू खरेदी करावे. करडे रोगमुक्त, तसेच परोपजीवी कीटकांपासून मुक्त असावीत.
बोकडाची निवड कळपात जन्मणाऱ्या शेळ्यांचे 50 टक्के गुणधर्म बोकडांवर अवलंबून असतात, म्हणून कळपाची सुधारणा बऱ्याच प्रमाणात पैदाशीच्या बोकडांवर अवलंबून असते.
शुद्ध जातीचाच बोकड शक्यतो विकत घ्यावा. ते न जमल्यास निदान सुधारित जातीचा बोकड घ्यावा.
विकायला आलेल्या बोकडांपैकी सर्वांत मोठा डौलदार व निरोगी बोकड निवडावा. त्या
डोके व खांद्याचा भाग दणकट, थोराड व नराची लक्षणे दाखवणारा असावा. या लक्षणांवरून पुढील पिढीत चांगले गुणधर्म संक्रमित होण्याची शक्य ता कळते.
शेळ्यांची जोपासणी

गाभण शेळीची जोपासना

गाभण शेळीची व्यवस्था स्वतंत्ररीत्या करावी.
तिला ओला व सुका चारा आणि मुबलक स्वच्छ पाणी यांची योग्य प्रमाणात व्यवस्था करावी.
शेवटच्या दोन – तीन महिन्यांत 200 ते 250 ग्रॅम पोषण आहार द्यावा.
शेळी नैसर्गिकपणे विते; मात्र काही घटनांमध्ये वैद्यकीय मदत आवश्य क असते.

दुभत्या शेळीची जोपासना

दुभत्या शेळ्यांना शारीरिक गरजेसाठी लागणाऱ्या ऊर्जेपेक्षा अतिरिक्त ऊर्जेची आवश्ययकता भासते.
म्हणून त्यांना ओल्या व सुक्याे चाऱ्यासोबतच 100 ग्रॅम खुराक प्रति लिटर दुधामागे जास्त द्यावा.
चारा देताना त्यामध्ये योग्य प्रमाणात मीठ व खनिजद्रव्ये मिसळून द्यावीत.

करडांची जोपासना

करडाच्या जन्मानंतर शेळी त्या पिल्लाला चाटू लागते; मात्र असे न घडल्यास कपड्याने करडास स्वच्छ पुसून घ्यावे.
नाका-तोंडातील चिकट द्रव स्वच्छ करून घ्यावा.
नाळ स्वच्छ ब्लेडने कापून टिंक्च र आयोडीन लावावे.
करडास एक – दोन तासांतच शेळीचा चीक पाजावा.
करडाने नैसर्गिकरीत्या चीक न प्यायल्यास त्याला तो काढून पाजावा.
दोन – तीन आठवड्यांनंतर त्याला कोवळा पाला द्यावा. पहिले तीन – चार महिने दूध पाजावे.
त्यानंतर मात्र त्याला शेळीपासून तोडून चरण्यास सोडावे.

पैदाशीच्या बोकडाची जोपासना

पैदाशीकरिता योग्य शारीरिक व वांशिक गुण असणाऱ्या निरोगी बोकडाची निवड करावी.
निवड करताना त्याचे वय एक वर्षापेक्षा जास्त असावे, तो मारका नसावा.
अशा बोकडास योग्य प्रमाणात हिरवा, वाळलेला चारा, खुराक व मुबलक पाण्याची व्यवस्था करावी.
destatalk.com

Post Views: [views id=”4416″]

2 thoughts on “शेळीपालन – निवड आणि जोपासना”

  1. शेळी पालन करण्याकरिता दशरथ घास बियाणे हवे आहे
    कुठे मिळणार ?

    Reply

Leave a Comment