शेती बरोबरच करा कुकुटपालन

शेती बरोबरच करा कुकुटपालन

शेती बरोबरच करा कुकुटपालन भारत हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशात शेतीच्या माध्यमातून पिकवल्या जाणाऱ्या अन्न धान्या बरोबरच इतर पदार्थांनाही तेवढीच मागणी आहे. कारण भारतात शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही पदार्थ खाणारे खवय्ये आहेत. शेतकऱ्यांनी शेती बरोबरच एखादा जोड धंदा किंवा व्यवसाय करावा असे बोलले जाते. शेतीसाठी उपलब्ध असलेल्या जागेत असा कोणता व्यवसाय करता येईल असा प्रश्न शेतकरी बांधवांना पडत असतो. जर शेतकऱ्यांनी आपल्या शेतीव्यवसायाला कोंबडी पालन किंवा ,कुकुट पालनाची जोड दिली तर याचा फायदा शेतकऱ्यांना निश्चित होईल. मुख्य म्हणजे कोंबडी पालनामुळे शेतकऱ्यांना सेंद्रिय खत मुबलक प्रमाणात उपलब्ध होते.
शेतीसाठी कुक्कुटपालनाचा वापर कसा होतो?
साधारणत: अंडयासाठी आणि मासांसाठी कुक्कुटपालन केले जाते ,परंतु शेतक-याने त्याच्या शेतीतील एक घटक म्हणून कोंबडीपालन केल्यास त्याचा शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. शेती करताना शेतकरी विविध सेंद्रिय खतांचा वापर करत असतात. कोंबड्यांची विष्ठा तसेच कोंबडीपासून मिळणा-या अंड्यांची टरफले यांच्या माध्यमातून तयार होणाऱ्या खताचा वापर शेतीमध्ये करता येऊ शकतो.
कॊंबडयांची घरे कशी असावीत ?भारतात तीन ऋतू आहेत उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. या तिन्ही ऋतूंमुळे हवामानात बदल होत असतात. या वातावरणीय बदलापासून आणि इतर प्राण्यांपासून संरक्षणासाठी कॊंबडयांना घराची आवश्यकता भासते. अंडी देणा-या कोंबडीस साधारणतः अडीच ते तीन चौरस फूट जागा लागते. आपण किती कोंबड्या पळणार आहोत यावर घराचे आकारमान ठरवावे. ही घरे जमीनीपासून २ फुट उंचीवर असावीत .सुरवातीस भिंतींची उंची २ ते ३ फुट ठेवून त्यावर छतापर्यत बारीक जाळ्या बसवाव्यात जेणेकरून हवा खेळती राहील. मधली उंची १२ ते १५ फूट ठेवावी आणि छत दोन्ही बाजूस उतरते ठेवावे.
कोंबडी पाळण्याची योग्य पद्धत कोणती?
सेंद्रिय कोंबडीपालन करतांना पिंजरा वापरू शकत नाही . जमिनीवर लिटर पसरुन त्यावर कोंबड्या वाढवाव्या या पद्धतीला गादी पध्दतीने कोंबडी पालन केलं जात. लिटरसाठी (गादीसाठी ) लाकडाचा भुसा ,शेगाचे फोलपट ,भाताचे तुस उपयोगात आणता येऊ शकतात. कारण यामध्ये कोंबडयांची विष्ठा यावर पडते व ती शोषली जाते. माध्यमे दरदोज हलवावी त्यामुळे ही कोरडी राहण्यास मदत होते व शेवटी याचा उपयोग खत म्हणून करता येतो.
कोंबड्याची निगा कशी ठेवावी?
कोंबडी पालन करताना वयोमानानुसार गट पाडावे. आठ आठवडयापर्यत च्या पिल्लांचा एक गट, दुसरा ९ते १८-२० म्हणजे वाढ होत असलेल्या पिल्लांचा गट, तिसरा २० आठवडयानंतरचा म्हणजे कोंबड्यांचा गट. प्रत्येक गटासाठी वेगवेगळे खाद्य निवडावे. आठ आठवडयापर्यंत चिकमँश (पिल्ले ) ,९ ते १६-१८ आठवड्यापर्यंत ग्रोअरमँश (वाढणारी ) व त्यानंतर लेअर मँश (कोंबडया )असे म्हणतात. या तिन्ही गटांमधील प्रथीनांचे प्रमाण अनुक्रमे २२,१६ व १८ टक्के असावे .
कोंबड्यांसाठी सकस आहाराचे घटक कोणते?
उत्तम आरोग्य असण्यासाठी कोंबड्यांना दोन घटकांचा समावेश असलेले अन्न पदार्थ द्यावेत. तसेच खाद्य संपुर्णत:संतुलित व चांगले असावे.
१) उर्जा पुरविणारे – उर्जा पुरविण्यासाठी मका ,ज्वारी ,बाजरी ,बारली ,गहू ही धान्ये वापरतात तर प्रथिनांसाठी वापरतात.
२) प्रथिने पुरविणारे – शेगदाणा,सोयाबीन ,तीळ पेंड यांच्या माध्यमातून प्रथिनांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा केला जातो.
पाण्याची व्यवस्था कशी असावी?
कोंबडी पालन करताना स्वच्छता अत्यंत महत्वाची असते. कोंबड्यांना पाणी उपलब्ध करून देतानाही काळजी घ्यावी. पाण्याची भांडी रोज स्वच्छ करून ताज्या पाण्याने भरावीत . याबरोबरच, पाच कोंबड्यांना अंडी देण्यासाठी १४-१२ -१२ इंच आकाराचा एक खुराडा जमिनीपेक्षा दीड ते दोन फुट उंच ठेवावा.
अशाप्रकारे जर शेती बरोबरच कोंबडी पालन किंवा कुकुट पालनाचा व्यवसाय केला तर शेतकऱ्यांना खत उपलब्ध होईलच त्याच बरोबर अंडी आणि कोंबड्यांच्या माध्यमातून दुहेरी फायदा मिळू शकेल.
santsahitya.in

Post Views: [views id=”4409″]

3 thoughts on “शेती बरोबरच करा कुकुटपालन”

Leave a Comment