Soyaben Rate : आठ दिवसानंतर सोयाबीनच्या दरात झाला बदल!

Soyaben Rate : आठ दिवसानंतर सोयाबीनच्या दरात झाला बदल!

 
खरीप पिकांचा हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी सोयाबीनचे काय झाले? हा प्रश्न कानी पडतोच. कारण  सोयाबीनची साठवणूक शेतकऱ्यांकडे असल्यामुळे दर वधरणार की कमी होणार याकडे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे लक्ष आहे. गेल्या आठ दिवसांपासून सोयाबीन हे 7 हजार 350 वर स्थिरावले होते. त्यामुळे आवकवरही त्याचा परिणाम झाला होता. मंगळवारी मात्र यामध्ये बदल झाला आहे. सोयाबीनच्या दरात काहीशी घट झाली असून त्याचा परिणाम आवकवर होणार हे पहावे लागणार आहे.
दर स्थिर असल्यामुळे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसाकाठी 18 ते 20 हजार पोत्यांची आवक ही सुरुच होती. असे असले तरी शेतकऱ्यांनी सोयाबीन हे राखून ठेवलेले आहेच. हंगामाच्या शेवटी सोयाबीनमध्ये विक्रमी वाढ होईल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे. त्यामुळेच साठवणूकीचे धाडस केले जात आहे. शिवाय सोयाबीन अधिकचा काळ साठवून ठेवले तरी काही परिणाम होत नाही किंवा वजनातही घट होत नाही.

100 रुपयांनी दरात घसरण

सोयाबीनची आवक सरासरी एवढीही नाही. असे असताना सोयाबीनच्या दराचे काय झाली याची उत्सुकता सर्वानाच लागेलेली आहे. एकीकडे रब्बी हंगामातील हरभऱ्याची काढणी झाली की विक्री करण्याचा धडाका शेतकऱ्यांनी सुरु केला मात्र, सोयाबीनबाबत सावध भूमिका बाळगली जात आहे. असे असतानाच मंगळवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 7 हजार 350 वरील सोयाबीन हे 7 हजार 250 येऊन ठेपले आहे. त्यामुळे असेच टप्प्याटप्प्याने दर कमी झाले तर हे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे ठरत आहे. मध्यंतरी 7 हजार 600 वर गेलेले सोयाबीन आता 7 हजार 250 रुपयांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा निर्णय बरोबर की चुकीचा हे तर येणारा काळच ठरवणार आहे.
हे पण वाचा:- कापसाची अवाक कमी होऊनही मार्केट मध्ये कापसाचीच चर्चा!

तुरीला हमीभावापेक्षा अधिकचा दर

खरीप हंगामातील तुरीचीही आवक सुरु झाली आहे. आतापर्यंत खरेदी केंद्रावरील दराप्रमाणेच खुल्या बाजारात तुरीला दर होते. पण गेल्या चार दिवसांमध्ये तुरीच्या दरात वाढ झाली आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला 6 हजार 650 चा दर मिळाला आहे तर खरेदी केंद्रावर 6 हजार 300 असा दर ठरवून देण्यात आलेला आहे. शिवाय हरभऱ्याचे दर हे 4 हजार 500 वरच स्थिर आहेत. सध्या रब्बी हंगामातील हरभरा तर खरिपातील सोयाबीन आणि तुरीची अधिकची आवक सुरु आहे.

हरभरा आता खरेदी केंद्रावर

राज्यात सर्वत्र आता हरभरा खरेदी केंद्र ही सुरु झाली आहेत. आतापर्यंत शेतकरी हे खुल्या बाजारात हरभऱ्याची विक्री करीत होते. पण बाजारपेठेतील दरात सुधारणा नाही शिवाय खरेदी केंद्राच्या माध्यमातून तालुक्याच्या ठिकाणी हरभरा विक्रीची सोय झाली आहे. त्यामुळे केंद्रावरील वाढते दर आणि गावाजवळच झालेली सोय यामुळे हरभरा खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची रेलचेल पाहवयास मिळत आहे.
source:- tv9 marathi

Leave a Comment