सोयाबीनची आवक वाढली, पण दराचे काय?

सोयाबीनची आवक वाढली, पण दराचे काय?

 
सबंध चार महिन्याच्या हंगामात जे झाले नाही ते हंगामाच्या अंतिम टप्प्यात  सोयाबीनबाबत पाहवयास मिळत आहे. आतापर्यंत दरात वाढ झाली तरी मोठ्या प्रमाणात आवक झालेली नव्हते. पण गेल्या 15 दिवासांपासून वाढत्या दराचा परिणाम हा  आवक होऊ लागला आहे. गतआठवड्यात दरात घसरण झाल्यानंतर आठवडाच्या पहिल्या दिवशी सोयाबीनचे काय होणार याची उत्सुकता लागली होती. पण सोमवारी सोयाबीनची आवक तर वाढलीच पण दरही वाढले आहेत. प्रति क्विंटलमागे सोयाबीनच्या दरात 100 रुपयांची वाढ झाली असून 7 हजार 350 वर सोयाबीन स्थिरावले आहे तर लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी 30 हजार पोत्यांची आवक झाली होती. सध्या खरिपातील सोयाबीन आणि रब्बी हंगामातील हरभऱ्याच्या आवकमध्ये जणूकाही स्पर्धाच लागली आहे असे चित्र आहे. मात्र, दरामध्ये सोयाबीन हेच आघाडीवर आहे.सध्याच्या दरावर सोयाबीन स्थिरावेल

गेल्या काही दिवासांपासून सोयाबीनच्या दरात कायम चढ-उतार राहिलेला आहे. मात्र, 7 हजार 300 ते 7 हजार 400 च्या दरम्यान सोयाबीनचे दर राहिलेले आहेत. सध्या आवक वाढूनही दरावर परिणाम होत नाही. बाजारपेठेत सोयाबीनची मागणी वाढल्याने दर हे स्थिर आहेत. शेतकऱ्यांनी साठवणूक केलेले सोयाबीन बाजारपेठेत दाखल होत आहे. शेतकऱ्यांना वाढीव दराची अपेक्षा असली तरी सोयाबीन हे सध्याच्या दरावरच स्थिरावेल असा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत.हरभऱ्याची सर्वाधिक आवक

सध्या रब्बी हंगामातील हरभऱ्याच्या काढणीची कामे जोमात सुरु आहेत. हरभरा खरेदी केंद्र सुरु केली असतानाही शेतकरी हे खुल्या बाजारपेठेतच विक्रीला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक ही 35 हजार पोत्यांवर आहे तर 4 हजार 600 ते 4 हजार 700 चा दर मिळत आहे. सध्या हरभरा आणि सोयाबीनच्या आवकमध्ये स्पर्धा असली तरी सोयाबीनचे दर हरभऱ्याच्या तुलनेत दुप्पट आहेत.
हे पण वाचा:- पाणंद रस्त्याच्या आराखाड्याला मंजुरी, ग्रामपंचायतीची भूमिका राहणार महत्वाची

सूर्यफुलाला 6 हजार 700 चा दर

रब्बी हंगामातील हरभरा आणि सुर्यफूलाची आवक वाढत आहे. सूर्यफुलाला प्रति क्विंटल 7 हजार 600 चा दर मिळत आहे. शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करीक कडधान्यावर भर दिला होता. पीक पध्दतीमधील बदलाचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत आहे.
source:- tv9 marathi

Leave a Comment