Soybean Market : सोयाबीनची विक्रमी आवक, पहा ५ दिवसच्या बंद नंतर बाजार पेठेचे चित्र ?

Soybean Market : सोयाबीनची विक्रमी आवक, पहा ५ दिवसच्या बंद नंतर बाजार पेठेचे चित्र ?

 
मार्च एंडिंग आणि पाडवा सण आणि त्याला लागूनच आलेला रविवार यामुळे सलग पाच दिवस राज्यातील  मुख्य बाजार समित्यांचे व्यवहार हे ठप्प होते. त्यामुळे शेतीमालाचे दर विशेषत: सोयाबीनचे काय होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. सोयाबीनच्या दरात 100 रुपयांची घट झाली आहे. असे असले तरी सोमवारी सोयाबीनची विक्रमी आवक झाली आहे.
सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. असे असताना पाच दिवसापूर्वी सोयाबीनचे दर हे 7 हजार 350 असे होते. हाच दर कायम असणार या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजार समितीमध्ये आणले पण दरात 100 रुपयांची घट झाली होती. तर दुसरीकडे खरिपातीलच तुरीची आणि रब्बी हंगामातील हरभऱ्याची आवक वाढली आहे.

हरभरा, सोयाबीनची विक्रमी आवक

आतापर्यंत हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरु होती. हमीभावापेक्षा कमी दर असतानाही बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक ही दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या हरभऱ्याला खुल्या बाजारपेठेत 4 हजार 500 ते 4 हजार 600 असा दर आहे. तर खरेदी केंद्रावर 5 हजार 230 रुपये दर ठरवून देण्यात आला आहे. खरेदी केंद्रावरील नियम अटींमुळे शेतकरी व्यापाऱ्यांकडेच विक्रीला प्राधान्य देत आहे. त्यामुळे सोमवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल 50 हजार पोत्यांची आवक झाली होती. तर सोयाबीनची आवक ही 30 हजार पोत्यांची झाली होती. शेतकऱ्यांना अजूनही सोयाबीन दर वाढीची अपेक्षा ही लागून राहिलेली आहेच.
हे पण वाचा:- किसान क्रेडिट कार्ड नेमके मिळवायचे कसे ? घ्या जाणून

तुरीला हमीभावापेक्षा अधिकचा दर

खरीप हंगामातील शेवटचे पीक असलेल्या तुरीची आवक सध्या सुरु झाली आहे. यंदा काढणीच्या दरम्यानचे ढगाळ वातावरण आणि शेंगअळीचा प्रादुर्भाव यामुळे उत्पदनात मोठी घट झाली होती. त्यामुळे सोयाबीन आणि कापसाप्रमाणे तुरीचेही दर वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे. दरवाढ सुरु असतानाच केंद्र सरकारने तूर आयातीला डिसेंबरपर्यंत वाढीव मुदत दिली आहे. या निर्णयामुळे तर तुरीच्या दरावर परिणाम झाला नसेल. सध्या तुरीला 6 हजार 400 दर मिळत आहे तक नाफेडच्यावतीने उभारण्यात आलेल्या खरेदी केंद्रावर 6 हजार 300 रुपये असा दर आहे.

पाच दिवस बंद असल्याचा परिणाम

गेल्या पाच दिवसांपासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार हे बंद होते. याचाच परिणाम सोमवारी दिसून आला आहे. सरासरीपेक्षा दुप्पट शेतीमालाची आवक झाली होती. दरामध्ये थोडाफार परिणाम झाला असला तरी शेतकऱ्यांनी आता विक्रीवर भऱ दिला आहे.
source:- tv9 marathi

Leave a Comment