Soybean Rate : सोयाबीनचे भाव काय राहातील?

Soybean Rate : सोयाबीनचे भाव काय राहातील?

 

खाद्यतेल दर कमी झाल्याचा ग्राहकांना लाभ कमीच

आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाचे दर जवळपास ३२ टक्क्यांनी कमी झाले. एक महिन्याआधी १७३५ डाॅलर प्रतिटनावरून पामतेल ८ जुलैला ११oo डाॅलरपर्यंत घसरले. तर मागील आठवडाभरातच दरात १० टक्के घट झाली. तर कच्चे सोयाबीन तेलाचे दरही २० टक्क्यांनी कमी झाले. सोयातेल १८२५ डाॅलरवरून १३५० डाॅलरपर्यंत नरमले. तर सूर्यफुल तेलही १६५० डाॅलरपर्यंत खाली आले.

मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्येतलाचे दर वाढले तेव्हा देशातील कंपन्यांनी लगेच किमती वाढवल्या. मात्र आता दर घसरले असतनाही देशात ग्राहकांना मात्र चढ्या दरानंच तेल घ्यावं लागंतय. खुद्द केंद्रीय अन्न मंत्रालयानंही मान्य केलंय.त्यामुळं कंपन्यांनी तेलाच्या एमआरपीत आठवडाभरात १० रुपयांची कपात करण्याच्या सूचना केंद्राने दिल्यात.

देशात गव्हाच्या दरात पुन्हा सुधारणा

केंद्र सरकारने गहू निर्यातबंदी केल्यानंतर देशात दर घसरतील असा अंदाज व्यक्त होत होता. सुरुवातीच्या काळात झालंही तसचं. परंतु सध्या देशात गव्हाला २००० ते २२५० रुपयांपर्यंत सर्वसाधारण दर मिळतोय. म्हणजेच निर्यातबंदीनंतरही खुल्या दर पुन्हा सुधारले. याचे मुख्य कारण म्हणजे सरकारकडील कमी साठा. सरकारकडे ३ जुलै २०२२ला २८४ लाख टन गहू साठा होता. तो ३ जुलै २०२१ लाख ६०३ लाख टन होता. म्हणजेच यंदा सरकारकडील गव्हाचा साठा ५३ टक्के कमी आहे. म्हणून खुल्या बाजारात गव्हाच्या दरात हळूहळू सुधारणा होत आहे, असे जाणकारांनी सांगितले.

युक्रेनमध्ये गहू काढणीला वेग

युद्धाच्या छायेत असलेल्या युक्रेनमध्ये वसंत ऋतुतील पिकांची काढणी आता सुरु झाली. आत्तापर्यंत येथील ४ लाख १७ हजार हेक्टरवर पिकांची काढणी पूर्ण झाली. आत्तापर्यंत १० लाख टन धान्याचीही मळणी झाल्याचे युक्रेनच्या कृषी विभागाने स्पष्ट केले. गव्हाची ३ टक्के काढणी झाली असून दीड लाख हेक्टर रिकामे झाले. बार्लीची मळणी अडीच लाख हेक्टरपर्यंत पोचलीये. युक्रेन गहू आणि बार्लीचा आघाडीवरचा निर्यातदार आहे. त्यामुळे येथील पीक काढणीकडे जगाचं लक्ष लागून आहे. येथे गहू काढणी पूर्ण झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात गहू पुरवठा वाढण्याची शक्यताये. असे झाल्यास गव्हाच्या दरावर दबाव येऊ शकतो, असे जाणकारांनी सांगितले.

तांदूळ, गहू पिठावरील जीएसटी रद्द करण्याची मागणी

केंद्र सरकारने ब्रॅंडेड नसलेल्या तांदूळ आणि गहू पिठावर पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला. मात्र सरकारच्या या निर्णयाला आता उद्योगांकडून विरोध होतोय. उद्योगांच्या मते सरकारच्या या निर्णयामुळे पीठ गिरण्या आणि भात प्रक्रिया उद्योग अडचणीत येतील. देशात जवळपास ६० हजार राईस मिल्स आहेत. मोठ्या ब्रॅंड्ससोबत स्पर्धा करता येत नसल्याने हे उद्योग आधीच अडचणीत आले आहेत. आता या उद्योगांच्या तांदूळ आणि गहू पिठावर जीएसटी लावल्यास उद्योग डबघाईला येतील. या उद्योगांवर शेतकऱ्यांचे अवलंबित्व जास्तये. जीएसटीमुळे शेतकऱ्यांना गहू आणि भाताला मिळणारा दर कमी होऊ शकतो, असा दावाही या उद्योगांनी केलाय

हे पण वाचा :- शेत रस्त्यासाठी अर्ज नेमका कसा करायचा?

सोयाबीनची भावपातळी काय राहील?

देशातील खरिप पेरणी अद्यापही मागीलवर्षीपेक्षा ९ टक्क्यांनी माघारलीये. ८ जुलैपर्यंत देशात ४०६ लाख हेक्टरवर पेरा झाला. तर मागीलवर्षी याच काळात ४४८ लाख हेक्टर खरिपाखाली आले होते. यात तेलबियांचा पेरा सर्वाधिक घटलेला दिसतोय. देशात आत्तापर्यंत ७७ लाख ८० हजार हेक्टरवर तेलबिया पिकांची लागवड झाली. तर मागील हंगामात याच कालावधीत ९७ लाख ५६ हजार हेक्टरवर पेरा झाला होता. यातही सोयाबीन लागवडीतील घट जास्तये. मागील हंगामात १२० लाख हेक्टरवर सोयाबीन पीक होतं.

परंतु यंदा ८ जुलैपर्यंत केवळ ५४ लाख ४३ हजार हेक्टरवर सोयाबीन लागवड होऊ शकली. मागीलवर्षी याच काळातील लागवड जवळपास ७० लाख हेक्टरवर होती. म्हणजेच यंदा सोयाबीन लागवड २२ टक्क्यांनी कमीये. जाणकारांच्या मते पुढील आठवडाभर सोयाबीन पेरणीसाठी महत्वाचाये. या काळात पेरणी वाढल्यास गेल्यावर्षीऐवढे क्षेत्र सोयाबीनखाली येऊ शकते. मात्र पाऊस कमी झाला किंवा असा राहिला तर पेरणीवर परिणाम होऊ शकतो. देशात आधीच गरजेपेक्षा कमी तेलबिया उत्पादन होतं.

त्यातही खरिप हा उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचा हंगामये. मागील हंगामात ११८ लाख टन सोयाबीन उत्पादन झालं होतं. मात्र यंदाची पीकपाण्याची परिस्थिती पाहता उत्पादनाबाबत लगेच अंदाज व्यक्त करणे योग्य नाही. मात्र दर टिकून राहू शकतात असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. चालू हंगामातील शिल्लक आणि नवीन उत्पादन पाहता दर ५५०० रुपयांपेक्षा कमी होण्याची शक्यता नाही, असा अंदाजही जाणकारांनी व्यक्त केलाय.

source :- agrowon