Soybean Rate : सोयाबीनच्या दरात घसरण सुरुच, शेतकऱ्यांना चिंता उन्हाळी हंगामातील पिकांची

Soybean Rate : सोयाबीनच्या दरात घसरण सुरुच, शेतकऱ्यांना चिंता उन्हाळी हंगामातील पिकांची

 
गेल्या काही दिवसांपासून शेतीमालाच्या दरात सुरु झालेली घसरण ही कायम आहे. तूर आणि हरभऱ्यापेक्षा सोयाबीनचे दर झपाट्याने घसरत आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अधिकच्या दराच्या अपेक्षेने साठवणूक केली होती त्यांचे मोठे नुकसान होणार आहे. सध्य खरीप हंगामातील सोयाबीनची आवक ही अंतिम टप्प्यातील आहे. त्यामुळे सध्याच्या घटत्या दराबरोबरच उन्हाळी हंगामातील सोयाबीनचे काय होणार याची धास्ती शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. सोयाबीनच्या मागणीत घट झाल्याने ही परस्थिती ओढावली आहे. सोयाबीन प्रमाणेच तूर आणि हरभऱ्याच्या दरात घसरण होत आहे. सोयापेंडच्या आयातीमुळे सोयाबीनच्या दरावर परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

उत्पादन वाढले तरी फायदा काय?

सध्या बाजारपेठेत खरीप हंगामातील सोयाबीनची आवक होत आहे. साठवणूक केलेले सोयाबीनही आता अंतिम टप्प्यात आहे. असे असले तरी शेतकऱ्यांना चिंता आहे ती उन्हाळी हंगामातील सोयाबीनची. उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे सोयाबीनची जोपसणा केली आहे. असे असताना आता दरात झपाट्याने घसरण सुरु झाली आहे. खरिपात उत्पादनात घट झाली तर आता घटत्या दरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान हे ठरलेलेच आहे. उन्हाळी हंगामातील सोयाबीनची काढणी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच दरात होत असलेली घट शेतकऱ्यांसाठी नुकसानीची ठरणार आहे.

गेल्या 8 दिवसांमध्ये शेतीमालाच्या दरात घसरण

केवळ सोयाबीनच्या दरात घसरण नव्हे तर तूर आणि रब्बी हंगामातील हरभऱ्याच्या दरातही घसरण सुरुच आहे. आठ दिवसांपूर्वी सोयाबीन हे 7 हजार 200 रुपयांवर स्तिर होते तर हरभरा आणि तूर हे हमीभावाच्या बरोबरीने. असे असताना केंद्र सरकारच्या काही निर्णयामुळे सोयाबीन आणि तुरीच्या दरात घसरण झाली आहे. तर हरभऱ्याची आवक वाढल्याने दर 4 हजार 500 वर येऊन ठेपला आहे.
हे पण वाचा : रासायनिक खताच्या किंमती जाहीर, अनुदानामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा..!

शेतकऱ्यांची भूमिका महत्वाची

शेतीमालाच्या दरात घसरण सुरु असली तरी आवक ही सुरुच आहे. शेतकरी आता सोयाबीन दरवाढीच्या प्रतीक्षेत नाही तर आहे ते सोयाबीन विक्री करण्याच्या भूमिकेत आहे. शिवाय तूर आणि हरभऱ्याच्या दरातही घसरण होत असताना आवक ही सुरुच आहे. अशा परस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काही दिवस साठवणूक करुन दरवाढीची प्रतिक्षा करणे गरजेचे आहे. उर्वरीत सोयाबीनचे नाही पण उन्हाळी हंगामातील सोयाबीनच्या दरवाढीसाठी शेतकऱ्यांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेणे गरजेचे असल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले.
source : tv9marathi

Leave a Comment