ठिबक करताना अशी घ्या काळजी होईल फायदा

ठिबक करताना अशी घ्या काळजी होईल फायदा
 
ठिबक सिंचन ही एक आधुनिक व शास्त्रीय पद्धत असून या पद्धतीचे फायदे आता सर्वश्रुत आहेत. तसेच विविध पिकांसाठी ठिबक सिंचनाचा वापर करण्यात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. तरी या पद्धतीला काही मार्यादादेखील पडतात. ठिबक संच अनेक कारणांमुळे बंद पडू शकते किंबहुना त्याच्या कार्य करण्याच्या क्षमतेत व्यत्यय निर्माण होऊ शकतो. प्रत्तेक शेतकऱ्याला त्याचा संच जास्तीत जास्त काळ टिकायला हवा असे वाटणे स्वाभाविक आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाची योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. याबाबत सविस्तर सांगायचे झाल्यास ठिबक सिंचानामध्ये मुख्यतः वाळूचा फिल्टरजाळीचा फिल्टरमुख्य लाईन उपमुख्य लाईनलॅटरलड्रीपर म्हणजेच तोट्या” बॉल व्हॉल्वफ्लश व्हॉल्व इ. घटकांचा समावेश असतो आणि यातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे गाळणी यंत्र (फिल्टर) हा तर ठिबक संचाचा आत्मा असतो असे समजल्या जाते.
अनेक शेतकरी ठिबकचा वापर करतातपरंतु त्याची पुरेशी देखभाल न केल्यामुळे ते संच बंद पडतात अथवा निकामी होतात. त्यामुळे ठिबक संच शेतात बसविल्यानंतर त्याकडे वारंवार लक्ष देणे अतिशय गरजेचे असते.
 
ठिबक सिंचन वापरतांना घ्यावयाची काळजी:-
१) शेतात ठिबक बसविण्यापूर्वी माती व पाणी यांबाबत शास्त्रीयदृष्ट्या पृथक्करण करून घ्यायला हवे.
२) ज्या पाण्यात लोहाचे प्रमाण ३ ते ४ पी.पी.एम एवढे असते ते पाणी ठिबक सिंचना करिता वापरणे घातक असते. कारणत्यामुळे ड्रीपर बंद पडल्यास ते परत सुरु करणे अतिशय जिकीरीचे होवून बसते.
३) मुख्य पंपसेटदाबमापक यंत्रेखत देण्यासाठीच्या यंत्रणापाणी मोजण्याचे मीटर व गाळण यंत्रणा नियमितपणे तपासून घ्याव्यात.
४) पाण्यात आढळणाऱ्या मातीचे व क्षारांचे प्रमाण लक्षात घेणे गरजेचे आहे व त्याद्वारा गाळण यंत्रणा स्वच्छ तसेच कार्यक्षम ठेवावी. पाण्याची दिशा उलट मार्गे करून गाळण यंत्रणा स्वच्छ करता येते. गाळण यंत्रणेवर बसविलेल्या दाबमापक यंत्रातील दाबाचे १० टक्क्यांपेक्षा जास्त पतन झाल्यास पाण्याची दिशा बदलवून बॅक फ्लशिंग करावे. लहान जल वाहिनीतून थोड्या जास्त दाबाखाली पाणी जाऊ दिल्याने त्यामध्ये वाळूमाती व ईतर केरकचरा निघून जातो.
५) ठिबक सिंचन संचाच्या पीव्हीसी किंवा एचडीपीईचा उपमुख्य नळ व मुख्य नळ यांना शक्यतो दीड फुटापर्यंत जमिनीमध्ये गाडावे. असे केल्याने पाईपवर सूर्यकिरणांचा परिणाम होत नाही व त्याचे आयुष्यमान वाढते. तसेच शेवाळाची समस्या देखील उद्भवत नाही.
६) हंगाम संपल्यानंतर येणाऱ्या हंगामासाठी ठिबक सिंचन संच वापरण्याअगोदर त्यास क्लोरीन किंवा आम्लाची आवश्यकतेनुसार प्रक्रिया करणे फायद्याचे असते. रासायनिक प्रक्रियेद्वारा तयार झालेल्या थरासाठी उपाय म्हणून आम्ल प्रक्रिया करताततर जिवाणूमुळे तयार झालेले अडथळे दूर करण्यासाठी क्लोरीन प्रक्रिया करतात.
७) आम्ल प्रक्रिया किंवा क्लोरीन प्रक्रिया झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी संपूर्ण ठिबक पाण्याने स्वच्छ करून घेणे आवश्यक असते.
८) रासायनिक द्रव्य पाण्यामध्ये सोडण्याची साधने ही प्रक्रिया प्रतिबंधक पदार्थांपासून (प्लास्टिकस्टेनलेस स्टील इ. पासून) बनविलेली असावीत.
९) आम्ल पाण्यात मिसळण्यासाठी पाण्यात आम्ल टाकावे. पाणी आम्लात टाकू नये. क्लोरीन वायू विषारी असल्याने त्याची हाताळणी माहितगार व्यक्तीने करणे फायद्याचे असते.
१०) आठवड्यातून एकदा वाळू गाळणीच्या टाकीचे झाकण उघडावे त्यातील वाळू हाताने ढवळून काढावी. नंतर बंद करून उलट्या दिशेने पाणी पाठवून त्याची टाकीदेखील स्वच्छ धुवून काढावी. टाकी स्वच्छ झाल्याने पाणी उत्तम प्रकारे गाळल्या जाते व तोट्या किंवा उपनळ बंद पडत नाही.
११) वाळू फिल्टरच्या प्रक्रियेमध्ये ७५ टक्के वाळू असावी नसल्यास त्यामध्ये वाळू टाकणे आवश्यक असते.
१२) जाळीचे फिल्टर उघडून त्यातील गाळणी काढावी त्यानंतर ती पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी व नंतर बसवावी.
१३) ठिबकमधील मेनलाईन व सबमेन या त्यांच्यावरी बसविलेल्या फ्लश व्हॉल्व्हने स्वच्छ करणे आवश्यक असते. त्यासाठी आठवड्यातून एकदा फ्लश व्हॉल्व्ह उघडून थोड्या जास्त दाबाखाली त्यातून पाणी बाहेर जाऊ द्यावे. म्हणजे मुख्य वाहिनी अथवा उपमुख्य नळ्यामध्ये साचलेली घाण पाण्यासोबत निघून जाईल.
१४) कोणत्याही पाईप अथवा लॅटरमधून पाण्याची गळती होवू देऊ नये.
१५) लॅटरल मध्ये तुटल्यास ती जॉयनरच्या सहाय्याने पुन्हा जोडावी.
१६) ठिबक संचाद्वारे खते देताना खते ही पाण्यात १०० टक्के विरघळणारी असावीत.
१७) याद्वारे पिकांना पाणी देतांना ते शास्त्रीयदृष्ट्या पाहिजे तेवढेच द्यावे. कारणपाणी किती लागेल हे पिकाचे वय व बाष्पीभवन तसेच पिक कोणते आहे यानुसार बदलत असते. म्हणून जे पिक घ्यावयाचे आहे त्याला किती पाणी लागेल यासाठी तज्ञााद्वारे मार्गदर्शन मिळवावे.
ठिबक सिंचन पद्धतीचा सुरुवातीचा भांडवली खर्च हा प्रवाही सिंचन पद्धतीपेक्षा जास्त असल्यानेसंच जस्तीत जास्त काळ टीकावा असे शेतकऱ्याला वाटणे स्वाभविक आहे.
 
ठिंबक संचाची निगा राखतांना खालील चार मुद्यांचा विचार करावा.
१)ठिबक संचाची पूर्णपणे देखभाल
२)फिल्टर स्वच्छ करणे
३)सबमेन व लॅटर स्वच्छ करणे
४)ठिबक संचाची रासायनिक प्रक्रिया करणे ठिबक करताना अशी 
ref:- krushisamrat
https://www.santsahitya.in/

Leave a Comment