गाव तिथं हवी माती ,पाणी परीक्षण लॅब

गाव तिथं हवी माती ,पाणी परीक्षण लॅब
 
गाव तिथं हवी माती ,पाणी परीक्षण लॅब शेती प्रधान देश. देशातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो तेंव्हा देशातील जमिनीच्या आरोग्याबद्दल सहसा कुणाला प्रश्न पडत नाही. ही शोकांतिका म्हणावी लागेल.त्याच जमिनीतून पिकते म्हणून जनता जगते.
दर शंभर वर्षा नंतर मनुष्यावर आलेल्या विषाणू संकटाची चर्चा गेली दहा महिने सर्वच जन करत आहेत.कुठलेच औषध,लस त्यावर नाही.त्यासाठी लागणाऱ्या प्राथमिक सोयी,सुविधा अस्तित्वात नव्हत्या.त्या निर्माण करण्यासाठी एकच धांदल,गोंधळ उडाला तो सर्वांनी अनुभवला.सोयी निर्माण करण्यात अनेक दिवस गेले ,जात आहे तोपर्यंत स्वतः ची, कुटुंबाची काळजी हाच उपाय प्रभावी ठरला.इलाज,लस,औषध आजही नाही ?

माती,पाणी लॅब ची गरज का ?

कोरोना ,कोविड १९ वर प्रभावी उपाय म्हणून स्वतःची प्रतिकार शक्ती वाढविण्याचा विचार पुढे आला.त्यासाठी फळे,भाजीपाला,कडधान्य,तृणधान्य ,अंडी मांस याचे आहारात महत्व विशद झाले.
मुळ प्रश्न असा की प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी जे उपाय सुचवले गेले ज्यांचे आहारात महत्व सांगितले गेले ते ज्या जमिनीतून पिकते तिच्या आरोग्याचं काय ?
आपली प्रतिकारशक्ती सक्षम ठेवायची असेल तर आपण जे अन्न सेवन करतो ते ज्या जमिनीतून पिकते तिच्या आरोग्याचा आधी विचार होणे गरजेचे. आजवर तसे झाले नाही. विषाणू संकट पूर्वी त्यावर विचार झाला नाही पण आता करणे क्रम प्राप्त ठरते तरच मानवाला आपली प्रतिकारशक्ती टिकवणे ,वाढवणे शक्य आहे .

क्रांती पूर्वी आणि नंतर..

आपल्याकडे देशात हरित क्रांती झाली.त्या पूर्वी देशी वाण ,बी बियाणे व जमिनीचे आरोग्य सेंद्रिय खताने युक्त होते.अती उत्पादन ची हाव नव्हती.उत्पादित होणारे अन्न धान्य ,भाजीपाला नैसर्गिक रित्या पिकवला जात होता.तिन्ही ऋतु कालमानानुसार बदलत होते. त्यामुळे त्या काळी रोग होते पण आजच्या सारख्या व्याधी नव्हत्या.(रोग..म्हणजे साथीचे,व्याधी म्हणजे आजचे आजार..बी.पी.डायबेटिस इत्यादी.)
हरित क्रांती नंतर संकरित वाण,बी बियाणे आले. अती उत्पादनासाठी बुरशी नाशक ,कीटक नाशक औषधे यांचा वापर वाढला.साहजिकच असे अन्न धान्य ,भाजीपाला सेवनाने रोग प्रतिकार शक्ती कमी कमी होत गेली.आज याविरुद्ध विचार करून उत्पन्न कमी आले तरी चालेल पण हा अतिरेक कमी करावा लागेल.असेही उत्पादित ३० टक्के धान्य नासाडी होते.शिजवलेले लाखो टन वाया जाते.

जमीन आरोग्य तपासणी..

आजच्या विषाणू संकट काळात ज्या प्रमाणे मनुष्य स्वतः चे आरोग्य तपासणी,स्वच्छ ता , याचे महत्व समोर आले.त्याच प्रमाणे या पुढील काळात जमिनीचे आरोग्य तपासणी नियमित करण्याची गरज आहे.
माती ,पाणी परीक्षण नियमित केले तरच जमिनीत कोणते पीक घ्यायचे, त्या पिकास कोणते खत द्यायचे,पाणी, त्याचा पी.यच.किती त्यानुसार कोणते खत किती द्यावे लागेल हे समजण्यासाठी नियमित परीक्षांची गरज आहे.
 
सद्या शेतकरी फक्त फळबाग लागवड करायची तरच त्याला माती पाणी परीक्षण ची सक्ती म्हणून ते करतो. पण यापुढे खऱ्या अर्थाने आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले जमिनीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी तालुका व गाव पातळीवर माती पाणी परीक्षण लॅब सुरू कराव्या लागतील.यासाठी वेळीच नियोजन करून धोरण स्वीकारले पाहिजे.नाहीतर आज जे मानवी आरोग्य विषाणू मुळे धोक्यात आले त्यावर पूर्व सुविधा अभावी जो गोंधळ उडाला त्या ही पेक्षा जास्त वाईट अवस्था व गोंधळ जमिनीचे आरोग्य बिघडल्याने निर्माण होणार हे निश्चित.
गाव पातळीवर लॅब सुविधा उपलब्ध झाल्यास शेतकरी खरिप व रब्बी पिके घेण्या अगोदर व नंतर पाहिजे तेव्हा परीक्षण करून घेऊ शकेल.यासाठी सक्ती करण्याची वेळ आली तर ती करावी लागेल . कृषीच्या प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी माती पाणी परीक्षण प्रमाणपत्र सक्तीचे करावे लागेल.
अलीकडे शासन ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी निधी देते त्यातच एक लॅब ची सुविधा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव असला पाहिजे.या लॅब साठी गावातील कृषी पदविका धारक,कृषी पदवीधर यांना विशेष ट्रेनिंग दिल्यास रोजगारही उपलब्ध होईल.त्यांच्या ज्ञानाचा गाव पातळीवर, देश विकासात सहभाग महत्वाचा ठरेल.गावातील शेतकऱ्यांना माफक दरात ग्राम पंचायत मार्फत ही सुविधा देणे शक्य आहे.
यासाठी गावातील तज्ञ शेतकरी,गाव प्रमुख,कृषी विभाग,शासन व प्रशासन पातळीवर प्रयत्न होऊन वेळीच नियोजन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रयोगशील शेतकरी व कृषी अर्थशास्त्र अभ्यासक उत्तम पुणे यांनी व्यक्त केली. गाव तिथं हवी माती गाव तिथं  गाव तिथं हवी माती गाव तिथं
 
उत्तम बादशहा पुणे
बी.काम. एम. ए.(अर्थशास्त्र)
९९२२८२७६१३.
मु.पो…ब्राम्हण गाव
तालुका..कोपरगाव
जिल्हा..अहमदनगर
आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या शेतकरी मित्रांनो 
 
हे पण वाचा 


माती परीक्षण, माती परीक्षण प्रयोगशाळा, माती परीक्षण केंद्र, soil testing, water testing , शेती विषयक माहिती pdf

agri farming , agri maharashtra , agriculture information , agriculture information in marathi

Leave a Comment