Tur Rate : सरकारचा तूर उत्पादकांना पुन्हा झटका
केंद्र सरकारने कोणताही तातडीची गरज नसताना तूर आणि उडीद आयातीसाठी दीर्घ कालावधीचे करार केले आहेत. म्यानमार, मोझांबिक आणि मालावी या देशांतून पुढील पाच वर्षे आयात होणार आहे. हा करार २०२१-२२ ते २५-२६ या काळासाठी करण्यात आला आहे. या करारानुसार म्यानमारमधून दरवर्षी अडीच लाख टन उडीद आणि एक लाख टन तूर आयात केली जाणार आहे. तर मालावीतून वर्षाला ५० हजार टन तूर आयात होईल.
तसेच मोझांबिकमधून वार्षिक दोन लाख टन तूर आयात केली जाईल. देशातील डाळींचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे करार करण्यात आले, असे सरकारने स्पष्ट केले. पण मागील वर्षात देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात शेतीमालाचे दर तेजीत होते. मात्र विक्रमी आयातीमुळं कडधान्याच्या दारने हमीभावही गाठला नाही.
मागील हंगामात तुरीचे उत्पादनही घटले होते. मात्र सरकारने विक्रमी ८ लाख ४० हजार टन तूर आयात केली. त्यामुळे शेतकऱ्यांना दर मिळाला नाही. गेल्या हंगामात तुरीला ६३०० रुपये हमीभाव सरकारने जाहिर केला होता. मात्र विक्रमी आयातीमुळे आत्तापर्यंत तुरीच्या दराने हमीभावही गाठला नाही.
यामुळे तूर उत्पादकांना मोठा फटका बसला. परिणामी चालू खरिपात तुरीची लागवड कमी होताना दिसत आहे. त्यातच सरकारने आता म्यानमार, मालावी आणि मोझांबिकशी करार करून दरवर्षी साडेतीन लाख टन आयातीचा निर्णय घेतला. याचा परिणाम शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरावर होईल.
त्यामुळे शेतकरी पेरा कमी करतील. सरकारच्या या धोरणामुळे देशात तूर उत्पादन कमी होऊन खाद्यतेलाप्रमाणे कायम आयातच करावी लागेल, अशी भीती जाणकारांनी व्यक्त केली.
हे पण वाचा:- Punjab dakh havaman andaj : आज पासून उत्तर महाराष्ट्र व राज्यात सुर्यदर्शन पण ‘या’ तारखेत राज्यात पुन्हा पाऊस
अमेरिकेत सोयाबीन, मक्याचे वायदे सुधारले
अमेरिकेत सोयाबीन (Soybean), मका (Maize) आणि गव्हाच्या वायद्यांत मंगळवारी सुधारणा पाहायला मिळाली. शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड अर्थात सीबाॅटवर डिसेंबरचे वायदे ६.२३ डाॅलर प्रतिबुशेल्सने झाले. तर सोयाबीन ४४ सेंटने वाढले. सोयाबीनचे नोव्हेंबर वायदे १३.८७ डाॅलर प्रतिबुशेल्सने पार पडले. तर गव्हाचे दर ४७ सेंटने वाढले होते. गव्हाचे सप्टेंबर महिन्यातील वायदे ८.२३ डाॅलरने झाले. अमेरिकेतील महत्वाच्या मका उत्पादक भागात उष्ण वातावरणाचा फटका बसतोय. तसेच सोयाबीन उत्पादन कमी राहण्याचा अंदाज युएसडीएने व्यक्त केला. त्यामुळे सोयाबीन वायद्यांत सुधारणा झाली आहे.
source:- ऍग्रोवोन