विलासराव देशमुख अभय योजना : विजबिल थकबाकीदार ग्राहकांसाठी योजना जाहीर- ऊर्जामंत्री नितीन राऊत

विलासराव देशमुख अभय योजना : विजबिल थकबाकीदार ग्राहकांसाठी योजना जाहीर- ऊर्जामंत्री नितीन राऊत

 
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी एका महत्त्वाच्या योजनेची घोषणा केली आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा बंद झालेल्या ग्राहकांना थकीत रकमेत सवलत आणि त्यांना पुन्हा वीज जोडणी देता यावी म्हणून, ‘विलासराव देशमुख अभय योजनेची’ घोषणा डॉ. नितीन राऊत यांनी केली. या योजनेमुळे राज्यातील 32 लाख ग्राहकांना पुन्हा वीज जोडणी मिळण्याची संधी प्राप्त होणार आहे. या योजनेमुळे राज्यातील बंद पडलेले कृषी, औद्योगिक व घरगुती वीज जोडण्या पुन्हा सुरु होतील. राज्यातील कायमस्वरूपी बंद पडलेले उद्योग, कृषी कनेक्शन सुरु होतील, तसेच रोजगार निर्माण होऊन राज्याचे अर्थचक्र सुरळीत होण्यास मदत होईल, असेही राऊत यांनी सांगितले.
राज्यात जवळपास 3 लाख 16 हजार 500 ग्राहकांच्या वीज पुरवठा कायमस्वरूपी बंद केलेला आहे. अशा ग्राहकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली असल्याचे नितीन राऊत यांनी सांगितले. राज्यात 9 हजार 354 कोटी रुपये थकबाकी असून, यामुळे राज्यात वीज मंडळाचे अर्थचक्र थांबल आहे.

विलासराव देशमुख अभय योजनेची वैशिष्ट्ये काय?

थकित मुद्दल एकरकमी भरणाऱ्यांना अधिकची सवलत
सुलभ हप्त्यात थकबाकी भरण्याची सोय
फेरजोडणीचा लाभ

योजनेचा कालावधी

1 मार्च ते 31 ऑगस्ट 2022
हे पण वाचा:- भारतातील पहिल अत्याधुनिक कांदा लागवड यंत्र

या योजनेचे फायदे काय?

32 लाख ग्राहकांना पुन्हा वीज जोडणी मिळणार
व्यावसायिक व औद्योगिक आस्थापणा पुन्हा सुरु होणार
मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती होणार
थकबाकी वसून होऊन महावितरणच्या आर्थिक स्थितीत सुधारणा
कायमस्वरूपी वीज पुरवठा बंद झालेल्या ग्राहकांना थकित रकमेत सवलत देणारी ही योजना आहे. राज्यात कायमस्वरुपी वीज पुरवठा बंद झालेल्या ग्राहकांची संख्या ही 32 लाख 16 हजार 500 आहे. तर एकूण थकबाकी ही 9 हजार 354 कोटी आहे. तर थकबाकीची मुळ रक्कम ही 6 हजार 261 आहे.
 
source:- ABP majha

Leave a Comment