Weather Report : पुढील ‘या’ महिन्यामध्ये ३ वेळा होऊ शकते अतिवृष्टी,ऑगस्टमध्ये 10 ते 12 दिवस पावसाचा खंड

Weather Report : पुढील ‘या’ महिन्यामध्ये ३ वेळा होऊ शकते अतिवृष्टी,ऑगस्टमध्ये 10 ते 12 दिवस पावसाचा खंड

सध्या महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस कोसळत असून धरणाची पाणी पातळी कमालीची वाढले असून बऱ्याच अंशी शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न जवळजवळ मिटला आहे. आपल्याला माहित आहेच की, जून महिना हा पावसाने पूर्णपणे कोरडा काढल्यानंतर मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने राज्यात दमदार हजेरी लावली.

जवळजवळ जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच सर्वदूर चांगला पाऊस होऊन शेतकरी राजाला खूप चांगला दिलासा मिळाला. या सगळ्या पावसाच्या बातम्या मध्येच अजून एक सुखावह बातमी समोर येत आहे. ती म्हणजे येणाऱ्या ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात किमान तीनदा तरी अतिवृष्टी होईल असा अंदाज आहे.

या बाबतीत बोलताना हवामान खात्याचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले की, ऑगस्ट महिन्यामध्ये जवळ जवळ दहा ते बारा दिवस पावसाचा खंड पडण्याची शक्यता आहे

परंतु जुलै महिन्यात ज्या प्रकारचा पाऊस झाला तसाच पाऊस 15 ऑगस्ट पर्यंत पडण्याची शक्यता आहे. तसाच जुलै सारखेच आणखी मोठे दोन ते तीन पाऊस ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पडतील.

हे पण वाचा :- पीएम किसान ई-केवायसी अंतिम मुदत आली, ‘या’ तारखे पर्यंत करा ई-केवायसी

 अप्पर वर्धा धरणाचे 13 दरवाजे उघडले

अप्पर वर्धा प्रकल्पाचे 13 दरवाजे 200 मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीला पूर येऊन आष्टी ते मोर्शी हा मार्ग बंद झाला आहे. त्यासोबतच निम्न वर्धाचे एकतीस दरवाजे शंभर सेंटिमीटरने उघडणार असल्‍याचे वर्धा नदी पात्रालगत अशा गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

त्यासोबतच कोल्हापूर जिल्ह्यात देखील सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली असून गगनबावडा, राधानगरी  आणि शाहूवाडी तालुक्यामधे बऱ्या प्रमाणात सरी कोसळत आहेत. तसेच सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात देखील पावसाचा जोर वाढू लागला आहे.

source :- krushi jagran