Weather Update : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला

Weather Update : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला

 

राज्यात मागील पाच दिवसांपासून माॅन्सून चांगलचा बरसत आहे. गुरुवारी सकाळीही अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. मात्र दुपारी पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र होते. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज जोरदार तर इतर भागांत हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यातील बहुतांश भागांत गुरुवारीही पावसाने हजेरी लावली. कोकणातील काही भागांत पावसाचा जोर वाढला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू झाला. या पावसामुळे भातरोप लागवडीला वेग आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम होता. पावसामुळे नद्यानाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली. मात्र पावसाचा जोर असाच राहिला तर पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात मात्र गुरुवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी राहिला. पश्चिम भागात थांबून थांबून पावसाच्या सरी होत होत्या. पूर्वेकडे मात्र प्रामुख्याने ढगाळ हवामानच राहिले. पावसाचा जोर कमी झाल्याने नद्यांच्या पाण्याची वाढलेली पातळी स्थिर झाली. सांगली जिल्ह्यातही पासाचा जोर कमी झाला होता.

पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला होता. पश्चिम पट्ट्यात जोरदार सरी बरसत आहेत. लोणावळा येथे १४६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुणे जिह्यातील जवळपास सर्वंच तालुक्यांत कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. तर सातारा जिल्ह्यातील कोयनासह सर्व प्रमुख धरणात पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. कोयना धरणात २४ तासात २.८८ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात चांगला पाऊस झाला. इतर भागांत मात्र पावसाचा जोर कमी होता.

हे पण वाचा :- सोयाबीन एक हजार रुपये कमी दराने विक्रीची नामुष्की

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत पावसाचा जोर गुरुवारी मंदवाला होता. औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील जवळपास सर्वंच मंडळांमध्ये पावसाची हजेरी होती. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील ८२ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. तर नांदेड जिल्ह्यातही गुरुवारी ठिकठिकाणी पाऊस झाला. मात्र पावासाचा जोर कमी होता.

तर हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तविली. तर राज्यातील इतर भागांत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला. आपल्या भागांत पाऊस झाला का? पिकांची स्थिती कशी आहे? आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा.

source :- agrowon