“सहकार क्षेत्र म्हणजे काय?”

“सहकार क्षेत्र म्हणजे काय?”

 

सहकार क्षेत्र म्हणजे काय? What is a cooperative sector? 

 

                              सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास सहकार म्हणजे सोबत मिळून काम करणे. विविध नागरिक एकत्र येऊन एखादी संघटना बनवतात. या संघटनेच्या माध्यमातून ते एखादं विशिष्ट प्रकारचं काम, व्यवसाय करतात तर त्याला सहकार असं संबोधलं जातं.

भारतात सहकार चळवळीची Of the cooperative movement सुरुवात 1904 मध्ये झाली. त्यावेळी फॅड्रिक निकर्सन नामक एका इंग्रज अधिकाऱ्याने सहकारी संस्थेची स्थापना केली होती.

त्यानंतर 1912 चा सहकारी संस्थांचा कायदा Law करण्यात आला. त्या कायद्यानुसार सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांची नोंदणी उपलब्ध झाली.

या कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी व प्रशासनाच्या कामकाजासाठी निबंधकाची नियुक्ती करण्यात आली आणि त्यामधूनच सहकार विभागाची स्थापना झाली.

केंद्र शासनाच्या Of the Central Government अखत्यारीतील सहकार हा विषय प्रांतिक सरकारांकडे सोपवण्याचा निर्णय झाल्यानंतर संबंधित प्रांतिक सरकारांनी आपापले कायदे करुन घेण्यास सुरुवात केली. मुंबई mumbai प्रांतासाठी 1925 चा सहकारी कायदा करण्यात आला. सन 1947 मध्ये बॉम्बे ॲग्रीकल्चरल प्रोड्युस मार्केट रेग्युलेशन ॲक्ट (1939) व बॉम्बे मनी लेंडर ॲक्ट (1946) हे कायदे निबंधकाच्या नियंत्रणाखाली आणण्यात आले.

देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार सहकार हा विषय संबंधित राज्य सरकारांकडे ठेवण्यात आला. त्यानुसार राज्य शासनाने सद्यस्थितीत अस्तित्वात असलेला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 हा कायदा पारीत केला.

या कायद्यात सहकारी संस्थांची नोंदणी, संस्थांच्या सभासदांचे हक्क व जबाबदाऱ्या, संस्थांची कर्तव्ये व विशेषाधिकार, राज्य शासनाचे संस्थांना विविध स्वरुपाचे आर्थिक व तत्सम सहाय्य, संस्थांची मालमत्ता व निधी, संस्थांचे व्यवस्थापन, संस्थांच्या व्यवहाराचे लेखापरिक्षण, चौकशी, तपासणी व देखरेख, विवादांची सोडवणूक, संस्थांचे कामकाजांचे समापन, निवडणूका, गुन्हे व शास्ती, अपिले, पुनरिक्षण व संस्थांचे कामकाजाविषयी अन्य सर्वसाधारण बाबींविषयीच्या सविस्तर तरतूदी करण्यात आलेल्या आहेत.

महाराष्ट्राच्या चालू वर्षीच्या (2021-22) अर्थसंकल्पात सहकार व पणन विभागासाठी 1284 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

सहकारी संस्थांचे पुढील चार प्रकार पडतात. The next four types of co-operatives fall.

 • कृषी पतसंस्था Agricultural Credit Union – कृषी क्षेत्रासाठी वित्तीय सेवा पुरवणे
 • बिगर कृषी पतसंस्था Non-agricultural credit unions – गैरकृषी क्षेत्रासाठी वित्तीय सेवा पुरवणे
 • कृषी बिगर पतसंस्था Krishi Bigar Patsanstha – कृषी क्षेत्रातील गैर वित्तीय सहकारी संस्था उदाहरणार्थ साखर कारखाने
 • बिगर कृषी बिगर पतसंस्था Non-agricultural non-credit societies – गैर कृषी क्षेत्रात कार्य करणारी गैर वित्तीय संस्था

सहकाराची जुनी तत्वे Old principles of cooperation

1844 रॅशडेल सोसायटीने सात सहकारी तत्वे मांडली. यांना सहकाराची जुनी तत्वे असेही म्हणतात.

 • १) खुले सभासदत्व Open membership
 • २) लोकशाही नियंत्रण Democratic control
 • ३) भांडवलावर मर्यादित व्याज Limited interest on capital
 • ४) राजकीय व धार्मिक तटस्थता Political and religious neutrality
 • ५) रोख व्यवहार Cash transactions
 • ६) शिक्षण प्रसार Dissemination of education
 • ७) व्यवहाराच्या प्रमाणात लाभांश Dividends in proportion to the transaction

1964 मध्ये डी जी कर्वे समितीने सहकाराची तत्वे सुचवली होती. 1966 मध्ये या तत्त्वांचा स्वीकार केला गेला.
सहकाराची नवीन तत्वे सेवेन बुक यांनी 1995 मध्ये मांडली.

 • १) खुले व ऐच्छिक सभासदत्व Open and voluntary membership
 • २) लोकशाही नियंत्रण
 • ३) सदस्यांचा आर्थिक सहभाग Financial participation of members
 • ४) सहकार शिक्षण Coo-perative education
 • ५) स्वातंत्र्य व स्वायत्तता Freedom and autonomy
 • ६) सहकारामध्ये सहकार 
 • ७) समाजिक कल्याणाची भावना A sense of social welfare

भारतातील सहकार चळवळ  Co-operative movement in India सहकार म्हणजे काय

फ्रेडरिक निकोलसन याने 1892 मध्ये ग्रामीण व शहरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्याची शिफारस केली. एडवर्ड लॉक यांच्या अध्यक्षतेखालील दुसऱ्या दुष्काळ विषयक आयोगाने(1901) कृषी पतसंस्था स्थापन करण्याची शिफारस केली.
1904 मध्ये सहकारी पतपुरवठा पतसंस्था कायदा अस्तित्वात आला. 1912 मध्ये सहकारी संस्था कायदा तयार करण्यात आला. सहकारी संस्थांचा विकास व समन्वय यांचा अभ्यास करण्यासाठी आर. जी. सरैया समितीची (1945) स्थापना करण्यात आली.या समितीला सहकार नियोजन समिती असेही म्हणतात. 1951 मध्ये ए. डी. गोरवला समितीची स्थापना करण्यात आली.
1979 मध्ये बी. शिवरामन यांच्या अध्यक्षतेखाली ‘कृषी व ग्रामीण विकासासाठी संस्थात्मक पतपुरवठा पुनरावलोकन समिती’ ची स्थापना करण्यात आली. या समितीने सहकारी बँकांची शिखर संस्था नाबार्डची स्थापना करण्याची शिफारस केली. केंद्र शासनाने 2002 मध्ये राष्ट्रीय सहकार धोरण जाहीर केले. यामध्ये सहकार वृद्धिंगत करण्यावर भर दिला गेला. 97 घटना दुरुस्ती कायदा 2011 नुसार सहकारी संस्था स्थापन करणे हा मूलभूत हक्क भारतीय जनतेला देण्यात आला.
सहकार आणि महाराष्ट्र 1919 च्या सुधारणा कायद्यान्वये प्रांतांना स्वतंत्र कायदे करण्याची सुविधा देण्यात आली. यानुसार मुंबई प्रांतासाठी 1925 मध्ये मुंबई सहकारी संस्था कायदा करण्यात आला.महाराष्ट्रात सहकारी चळवळीची सुरुवात 1910 मध्ये प्राथमिक कृषी पतसंस्थेच्या स्थापने झाली.
महाराष्ट्रात 1950 मध्ये प्रवरानगर येथे पहिला सहकारी साखर कारखाना उभारला गेला. हा भारतातीलच नव्हे तर आशियातील पहिला सहकारी कारखाना होता. महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा करण्यात आला. याला अनुसरून 1961 मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था नियम लागू करण्यात आले.
97 व्या घटना दुरुस्ती ला अनुसरून महाराष्ट्र सहकारी कायद्यात बदल करून महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था दुरुस्ती कायदा 2013 करण्यात आला.महाराष्ट्र शासनाने 2012 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष म्हणून साजरे केले. यावेळी सहकारातून समृद्धीकडे हा नारा देण्यात आला.
सध्या सहकारातून आणि उद्योगधंदे उभारले जात आहेत. देशातील सहकारी चळवळ पैकी सर्वाधिक यशस्वी सहकारी चळवळ महाराष्ट्रामध्ये दिसून आली. महाराष्ट्र देशातील एक अग्रेसर राज्य बनण्यामध्ये सहकार आणि सहकारी चळवळींचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्र मध्ये विविध उद्योगांना अनुसरून विविध सहकारी संघटना सध्या अस्तित्वात आहेत. उदा. सहकारी साखर कारखाने, सहकारी खरेदी विक्री संघ इत्यादी. या सहकारातून समृद्धीकडे जाणारा मार्ग निर्माण करणाऱ्या मार्गिका ठरल्या आहेत. cooperation movement in Marathi
सहकार चळवळ कृषिप्रधान भारतीय देशांमध्ये फक्त कृषी मध्येच नव्हे तर वित्त गृहनिर्माण खरेदी-विक्री अशा असंख्य संघटित व असंघटित क्षेत्रामध्ये सध्या सहकार चळवळ कार्यरत असताना दिसून येते.
विठ्ठलराव विखे पाटील, रत्नाप्पा कुंभार, धनंजय रामचंद्र गाडगीळ यांनी सहकाराचा पाया घातला. ‘दुधाची टंचाई असलेला देश’ ही भारताची ओळख पुसून या देशात ‘दुधाचा महापूर’ आणणारे धवलक्रांतीचे जनक डॉ. वर्गिस कुरियन यांनी ‘अमूल’च्या रुपात सहकारी संस्थेची उभारणी केली
 
संदर्भ:- BBC Marathi, nitinsir.in

Leave a Comment