कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) का तयार केल्या गेल्या ?

कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) का तयार केल्या गेल्या ?

 
१९४७ साली भारत स्वतंत्र झाला. त्याकाळात भारतात सावकारांचे मोठे प्रस्थ होते. शेतकरी कर्ज सावकारांकडून घेत असत परंतु ते फेडताना मात्र त्यांची वाताहत होत असे. त्याला कारण असे होते की, सावकार कर्ज देताना जे व्याज लावत असत त्याची आकडेमोड अशिक्षितपणामुळे सर्वसाधारण शेतकऱ्याच्या आकलनाच्या पलीकडे असे.
आणि जेव्हा शेतकऱ्यांचं पीक त्याच्या हातात येई तेव्हा हे सावकार लोक त्याच्या शेतात जाऊन कवडीमोलाने त्याच पीक घेऊन जात असत आणि शेतकऱ्याला त्याचे पैसे पण देत नसत. अशाने शेतकऱ्यांची पिळवणूक होई व शेतकरी मेटाकुटीला येई. शेतकऱ्यांचे मरायचे दिवस आले तेव्हा तत्कालीन पंतप्रधानांना ‘कृषी उत्पन्न बाजार समिती’ (APMC) ची संकल्पना सांगितली गेली. या
मध्ये अस होत की शेतकरी आपलं पीक फक्त आणि फक्त बाजार समिती मध्येच आणून विकू शकतो, दुसरीकडे नाही. यामुळे झालं काय, तर सावकार जे पीक शेतीतून सरळ सरळ उचलत होता त्याला आळा बसला. परंतु आपण शेतकऱ्यांचं एका प्रकारे शोषण बंद करून दुसऱ्या प्रकारे चालू करत आहोत, ही बाब मात्र कोणाच्याही लक्षात आली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे  सावकारी शोषण सहन करण्याची शेतकऱ्याची कुवत नव्हती पण समितीत होणार शोषण शेतकरी सहन करू शकत होता कारण हातात थोडी का होईना पण मिळकत येत होती. कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) का तयार केल्या गेल्या ?

हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारचा अतिवृष्टीग्रस्तांसाठी मोठा निर्णय; पहा काय आहे निर्णय

कृषी उत्पन्न बाजार समितीचे फायदे-

 
१. शेतीमाल हा बोली लावून विकला जातो (लिलाव पद्धतीप्रमाणे). यामुळे शेतकरी त्याचा माल त्या व्यक्तीला किंवा व्यापाऱ्याला विकतो जेथे त्याला योग्य वा जास्त भाव मिळतो.
२. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जी दुकाने असतात, त्यांच्याकडे परवाना (licence) असतो व ती अधिकृत असतात. त्यामुळे शेतीमाल घेतला आणि व्यापारी गायबच झाला, अशा प्रकारच्या घटना तिथे होत नाहीत.
३. अडत्या (Commission Agent)- हा जो मोहरा असतो तो थोडीफार शेतकऱ्यांना मदत करतो. माल आणणे, व्यापार करणे, वजन करणे वा माल उतरवणे. यासाठी शेतकऱ्याला त्याला थोडा पैसा मोजावा लागतो, ही गोष्ट आलीच.
४. फसवणूक होऊ नये म्हणून शेतीमालावर जी बोली लावली जाते त्याचे लिखित स्वरूपात पुरावे ठेवले जातात (पावती).
 
आमच्या  संतसाहित्य  या वेबसाईट ला भेट द्यायला विसरू नका.

Leave a Comment