“वृक्ष वल्ली आम्हा सोयरे..!” ५ जून जागतिक पर्यावरण दिवस- उत्तम पुणे

“वृक्ष वल्ली आम्हा सोयरे..!” ५ जून जागतिक पर्यावरण दिवस- उत्तम पुणे
 
संपूर्ण जगाची ओळख टिकून ठेवण्यासाठी महत्वाचा घटक म्हणजे पर्यावरण होय.या दिनाचे महत्व,त्याची गरज का निर्माण झाली ,दर वर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून का साजरा केला जातो.त्यावर एक दृष्टीक्षेप.
पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी तमाम जन माणसात जागरूकता व सकारात्मक दृष्टी निर्माण व्हावी हा मुख्य उद्देश.
या दिवसाची घोषणा युनायटेड नेषण ने केली.या दिवसाची सुरुवात संयुक्त राष्ट्र परिषदेत १९७२ साली करण्यात आली व ५ जून १९७४ साली पहिला जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला.त्यात आज १४० पेक्षा जास्त देश सहभाग घेत आहेत.
जगात अस्तित्वात असलेल्या विविध प्राणी,वनस्पती यांचे दृष्टीने वातावरण एक महत्वाचा घटक.वातावरणाची स्वछता,त्याचे प्रदूषण याचा आपल्या जीवनाशी घनिष्ट संबंध येतो.मानव ,जीव सृष्टी आणि पर्यावरण एकाच ” नाण्याच्या दोन बाजु.” म्हंटल्यावर वावगे ठरणार नाही.
आपल्या भोवतीचे पर्यावरण जैविक ,अजैविक घटकांनी बनलेले आहे.सजीव मध्ये सूक्ष्म जीव,कीटक,प्राणी ,पक्षी,वनस्पती पिके यांचा समावेश तर अजैविक पर्वत ,खडक,नदी, वारा याचा समावेश होतो.
वाढती लोकसंख्या त्याच बरोबर झपाट्याने होणारा विकास याचा परिणाम सभोवतीच्या वातावरणात होऊन त्यातून पर्यावरणाला धोका निर्माण होत असल्याने त्या विषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी हा दिवस.
विकासाच्या विविध योजना राबविल्या जात असताना त्यासाठी होणारी वृक्ष तोड,त्यातून बिघडणार निसर्गाचं संतुलन त्याचा थेट पर्यावरणावर होणारा परिणाम याचा हिशोब करणारा हा दिवस.
मानवी लोक वस्ती,त्यासाठी लागणारे रस्ते,राहण्यासाठी घरे यातून निसर्गाची होणारी अपरिमित हानी तसेच उद्योग ,व्यवसाय उभारताना त्यातून बाहेर पडणारे पाणी,विविध वायू यातून मानवी जीवनावर तसेच वनस्पती व प्राणी पक्षी व पिके यावर होणारा परिणाम कमी करण्या साठी सकारात्मक विचार जनतेत रुजविणे व पर्यावरण वाचविणे आवश्यक ठरते .
मानव निर्मित तसेच कारखान्यातून होणारे प्रदुषण कमी व्हावे यासाठी निसर्गातील जल,जंगल व विविध जीव वाचविण्यासाठी पर्यावरण रक्षण आज काळाची गरज आहे.त्यात प्रत्येकाचा सहभाग ही तितकाच महत्वाचा आहे.
निसर्गातील झाडे,पाण्याचे स्रोत प्रदूषित होणार नाही व त्यामुळे जंगल व पाण्यातील असणारी जैवविविधता नष्ट होऊ नये म्हणून जे प्रयत्न ,उपाय योजना विविध देशात केल्या जातात त्याचा वापर करून जैवविविधता वाचविणे साठी यातून प्रेरणा घेऊन काम करणे हा पर्यावरण दिनाचा मुख्य उद्देश.

पर्यावरण व पीक…

आज पर्यावरणात होणाऱ्या बदलाचे परिणाम बघितले तर अनेक पिकाचे अस्तित्व नष्ट होत आहे. विविध रोग,कीड यामुळे पीक धोक्यात असल्याचे दिसते.पूर्वी निसर्गात उपलब्ध अनेक कीड त्यांचे प्रजाती या एकमेकावर अवलंबून असत.त्यातील मित्र कीड ही मानव निर्मित अती कीड नाशक वापरणे संपुष्टात आली.उपद्रवी किडी मुळे देशातीलच नाही तर संपूर्ण जगाची अन्न सुरक्षा धोक्यात येऊ पाहत आहे.त्यासाठी पर्यावरणातील जल,स्थल व अवकाशातील जैवविविधता वाचविणे आवश्यक ठरते. मागे डाळिंब बागेवर आलेला तेल्या,टोमॅटो येणारे विविध विषाणू जन्य रोग ,नुकतेच येऊ घातलेली टोळ धाड सारखी कीड पाहता त्यासाठी पर्यावरण रक्षण व संवर्धन महत्वाचे.

पर्यावरण व मनुष्य….

मानवी जीवनावर पर्यावरणाचं चांगला वाईट ,परिणाम होत असतो.आपल्या आरोग्यासाठी शुद्ध हवा,पाणी ,अन्न,विविध वस्तू पुरविण्याचे काम निसर्ग करतो.पण आपल्या अनेक आघातामुळे हवा ,पाणी दूषित होते.गरजेच्या अनेक वस्तू बनविताना त्यातून बाहेर पडणारे अशुद्ध पाणी, वायू यातून मिळणारे अन्न धान्य प्रदूषित होते.ते खाण्यात आल्यास आपली रोग प्रतिकार शक्ती कमी होऊन सर्व मानव जात आरोग्य समस्यांनी त्रस्त होते.अनेक रोग,विषाणू संकटावर मात करण्यासाठी शरीरात असलेली शक्ती कमी झाल्याने साथीचे रोग बळावतात.त्यावर मात करण्यासाठी शरीरात प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी पर्यावरणाचे संरक्षण व रक्षण गरजेचे. आज कोवीड१९ सारख्या जागतिक महामारी वर प्रत्येकाने आपली शारीरिक प्रतिकार क्षमता वाढविणे जसे महत्वाचे तसेच देश व जागतिक पर्यावरण ,जैव विविधता जतन करणे ती सांभाळणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
वृक्ष वल्ली आम्हा सोयरे… निसर्गातील प्रत्येक झाड आपले मित्र, सगे सोयरे आहे.त्यापासून आपणास पुरेसा प्राणवायू मिळतो.व वातावरणातील कार्बन डायऑक्साइड संतुलित करण्याचे काम ही जंगलं करत असतात .त्यांचे सवृक्षन व नवीन लागवड करणे तितकेच महत्त्वाचे.
संतुलित जागतिक पर्यावरण साठी तसेच निर्माण होणारी ग्लोबल वॉर्मिग ची समस्या कमी करायची असेल तर निसर्गाचे चक्र व्यवस्थित सुरू ठेवण्यासाठी वृक्ष तोड बंद करून त्याचे जतन करावे लागेल.अन्न व पाण्याची नासाडी थांबवावी लागेल.अन्यता काही दशलक्ष प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर त्याही वाचविण्याची हीच ति वेळ आहे.
वट पौर्णिमा : वट वृक्ष महत्व… पर्यावरणाचे दृष्टीने सर्वात जास्त ऑक्सिजन पुरवणारे झाड तसेच महाभारतातील कथे नुसार या दिवसाला महत्व.सत्यवान आणि सावित्री यांची पौराणिक कथा ,ज्या झाडाखाली आपल्या पतीचे प्राण यमाचे दाढेतून परत आणले तो हा दिवस.म्हणून या दिवशी प्रत्येक सौ भग्यवती महिला वट वृक्षाचे पूजन करून सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून व्रत करतात.त्यातूनच वृक्ष संगोपणांच महत्व विषद होते.
झाडा बद्दल असलेला आदर,प्रेम आपुलकी म्हणजे राजस्थान येथील एका समजतील महिलांनी केलेलं चीपको आंदोलन.वृक्षाची तोड होऊ नये म्हणून ३५० पेक्षा जास्त महिलांनी झाडाला कवटाळून आपले प्राण दिले.या चीपको आंदोलनातील महिलांचा सहभाग ही विशेष बाब.त्यानंतर जंगल वाचविण्यासाठी इतरही राज्यात असेच आंदोलन केले गेले.जंगल आणि पर्यावरण वाचविण्यासाठी ते प्रभावी ठरले.
नुकताच २० मे. रोजी जागतिक मधमाशी दिवस साजरा झाला.मधमाशी चे जतन करावे लागेल अन्यथा ज्या दिवशी मधमाशी संपेल त्या दिवशी जागतिक अन्न सुरक्षा हे मोठ संकट जगासमोर असेल.असे प्रसिद्ध शास्त्रज्ञ आईन स्टाईन यांनी भविष्य व्यक्त केले आहे.
तेव्हा जगातील मानव जाती बरोबर,प्राणी,पक्षी,पीक,विविध वनस्पती,पाणी व पाण्याचे स्रोत प्रदूषित न होता पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. यासाठी गरज नकारात्मक विचार सोडून आज चा जागतिक …आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिवस साजरा करण्याची… नुकतेच जागतिक कीर्तीचे पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा अनंतात विलीन झाले त्यांना अभिवादन.
झाडे लावू..झाडे जगवू…!
पर्यावरणाचं रक्षण करू…!!
लेखक,
उत्तम बादशहा पुणे
बी.काम. एम. ए.अर्थशास्त्र
(लेखक, शेतकरी असून शेती विषयक प्रश्नाचे अभ्यासक आहेत) ९९२२८२७६१३.
मु.पो -ब्राम्हण गाव
तालुका-कोपरगाव
जिल्हा-अहमदनगर
पिन-४२३६०१.
 

हे  पण वाचा :- मान्सूनची राज्याकडे वेगाने कूच, 2-3 दिवसात राज्यात धडकण्याची शक्यता

 
आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

Leave a Comment