“एरंड लागवड माहिती”

“एरंड लागवड माहिती”
 
एरंड ही वर्षायू किंवा बहुवर्षायू वनस्पती युफोर्बिएसी कुलातील आहे. तिचे शास्त्रीय नाव रिसिनस कम्युनिस (ricinus communis) असे आहे. ही मूळची आफ्रिकेतील असून उष्ण प्रदेशातील बहुतेक देशांमध्ये आढळते. भारतात सर्वत्र या वनस्पतीची लागवड केली जाते. काही भागात ही वनस्पती लागवडीशिवायही वाढलेली आढळते. एरंड हे ३-५ मी. उंचीचे लहान झाड असून त्याचे खोड ठिसूळ असते. पाने हस्ताकृती, विभागलेली पण साधी असतात. पानांचे खंड दातेरी आणि देठ लांब असतात. पानाच्या खालच्या बाजूवर, देठांवर व खोडावर राखाडी छटा दिसते. शेंड्याकडे उभ्या मंजरीवर द्विलिंगी हिरवट फुले डिसेंबर-मार्च मध्ये येतात. नरफुले खालच्या भागात आणि मादीफुले वरच्या भागात असतात. फळे काटेरी व गोलाकार असून तडकून फुटणारी (स्फुटनशील) असतात. काटेरी बोंडात एक-बीजाणू तीन बिया असतात. बिया कठिण, लांबट व पिंगट असून त्यावर चित्रविचित्र ठिपके असतात.(ricinus oil)
 

हवामान

एरंडी हे पीक अवर्षणग्रस्त प्रतिसाद देत असल्याने ४० ते ५० सेंमी पर्यंत पाऊस पडणाऱ्या क्षेत्रात हे पीक चांगले येऊ शकते. एरंडीस कोरडी व उष्ण हवा मानवते.
 
माहिती व्हिडीओ स्वरूपात पहा 

जमीन

सर्वसाधारणपणे एरंडीचे पीक लागवडी खाली असलेल्या अनेक प्रकारच्या जमिनीत येऊ शकते. भारी जमिनीत हे पीक अधिक कालावधी घेऊन जास्त उत्पादन देते.
 

पूर्व मशागत

या पिकाच्या मुळ्या जमिनीत खोलवर जात असल्या कारणाने जमिनीचा नांगरट २० ते ३० सेंमी. खोलवर करावी. त्यावर २ – ३ फुळवाच्या पाळ्या देऊन जमीन चांगली तयार करावी, त्यामुळे बियांची उगवण व रोपांची वाढ योग्य प्रमाणात होते.
 

पेरणी

जून महिन्यात पावसाला सुरू झाल्यावर जमिनीत पुरेशी ओल व वापसा असताना एरंडीची लागवड इतर पिकांबरोबर करावी. पाऊस उशिरा सुरू झाल्यास पेरणी ऑगस्टपर्यंत करण्यास हरकत नाही.पेरणी करताना एका ठिकाणी २ बिया ५ ते ७.५ सें. मी. खोलीवर लावात. पेरणी केल्यानंतर १५ दिवसांनी विरळणी करून प्रत्यके ठिकाणी एकाच रोप ठेवावे. हेक्टरी झाडांची संख्या ३०,००० ते ४०,००० असणे आवशयक आहे.एरंडीचे बियाणे २४ ते ४८ तास पाण्यात भिजवून लावल्यास बियांची उगवण लवकरात लवकर व जोमदार होते. एरंडीच्या लागवडीसाठी जातीप्रमाणे जमिनीच्या प्रकारानुसार मागीलप्रमाणे बियाणे वापरावे.
 

अन्नद्रव्य पुरवठा

एरंडी पीक नत्र खताला चांगला प्रतिसाद देत असल्याकारणाने जमिनीच्या प्रतीप्रमाणे नत्राची मात्रा दोन किंवा तीन हप्त्यान द्यावी.एरंडी पिकाच्या मुळ्या खोल जमिनीत जात असल्यामुळे ते अन्नशोषण करणारे पीक आहे. म्हणून हुमखास उत्पादनासाठी माती परीक्षणांवर आधारीत अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे गरजेचे आहे. अन्नद्रव्यांचा पुरवठा करताना किमान २५% पुरवठा सेंद्रिय खतातून करावा.
 

पाणी व्यवस्थापन

एरंडी या पिकासाठी ५० ते ६० सें. मी. एवढे पाणी पुरेसे होते. म्हणजेच कमी पाऊस पडणाऱ्या भागातदेखील हे पीक चांगले उत्पादन देऊ शकते.एरंडी हे पीक जास्त पाण्याच्या प्रत्येक अवस्थेला फारच संवेदनशील आहे. यामुळे पिकाच्या आर्थिक उत्पादनासाठी जमिनीत उपलब्ध पाणी, योग्य वाणांचा वापर त्याचप्रमाणे पाणी देण्याचा काळ व पिकाची वाढीची अवस्था या सर्व बाबी विचारात घ्याव्यात.
आधी उत्पादनासाठी बुटक्या संकरीत जातींचा वापर करणे गरजेचे आहे. या जातीस वाढीसाठी जास्त पाण्याची आवश्यकता कमीअसते. विशेषत: या पिकाला जमिनीत एकून उपलब्ध ओलाव्यापैकी ५० % पाणी उडून गेल्यावर पाणी दिल्यास हितावह ठरते. यापेक्षा ओलावा जास्त नाहीसा झाल्याने मात्र पिकाच्या उत्पादनात घट येते.एरंडीची काढणी वेळेवर होण्यासाठी पाणी देण्याची वेळ विचारता घेणे गरजेचे आहे.
त्यासाठी या पिकांस काढणीपूर्वी ३ ते ४ आठवडे अगोदर पाण्याची पाळी देऊ नये. एरंडीची बोंडे तयार झाल्यावर या पिकास पाण्याची गरज नसते. एरंडी या पिकाची इतर पिकाच्या मानाने जमिनीच्या खोल थरातून ओलावा शोषणाची क्षमता जास्त आहे. हे पीक विशेषत: दुष्काळी भागासाठी वरदान आहे.
 

कीडरोग व त्यांचा बंदोबस्त

एरंडीवर उंटअळी, शेंडे व बोंडे पोखरणाऱ्या अळीचा फार मोठ्या प्रमाणार प्रादुर्भाव आढळून येतो. त्याचा उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो. अळीचे नियंत्रण करण्यासाठी खालीलप्रमाणे उपाय करावेत.उंटअळीचा प्रादुर्भाव थोठ्या प्रमाणात असल्यास हाताने अळ्या वेचून घ्याव्यात व रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा. पिकाचे सुरुवातीस १ ते २ महिने उंट अळीपासून सरंक्षण करावे. “एरंड लागवड माहिती” 
 

खते yrand lagwad mahiti

प्रमाण (कि./हे) – नत्र, स्फुरद व पालाश देण्याची वेळ – ६०:००: ० (खान्देश विभागासाठी) ६०:४०:० (सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यासाठी) अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद पेरणीचे वेळेस पेरुन द्यावे व उरलेले नत्र ४० ते ४५ दिवसांनी द्यावे. “एरंड लागवड माहिती”  “एरंड लागवड माहिती”  “एरंड लागवड माहिती”
 

काढणी व मळणी

एरंडीचे घड पक्व झाल्यावर पूर्णपणे वाळल्यावर ते तोडून घ्यावेत. ४ – ५ दिवस वाळवावेत. वाळलेले घड काठीने किंवा मोगारीने बडवून बिया वेगळ्या कराव्यात व वारा देऊन स्वच्छ कराव्यात. जिरायती पिकाची घड काढणी साधारणपणे २ – ३ वेळा करावी. तसेच बागायती पिकाची घड काढणी ४ – ५ वेळा करावी. अलीकडे मळणीसाठी थ्रेशर उपलब्ध आहेत. मोठ्या क्षेत्रावर जर एरंडीचे पीक असेल तर मळणीसाठी थ्रेशरचा वापर करावा.

 

Leave a Comment