"कोंबडी पालन बॉयलर उत्पादन"

कुकुट पालन व्यवसाय-बॉयलर उत्पादन:- agriculture information in marathi

कुकुट पालन व्यवसाय-बॉयलर उत्पादन:- agriculture information in marathi
 
“कोंबडी पालन कोंबडी कुक्कुट मांस उत्पादनांमध्ये ब्रॉयलरला सर्वाधिक पसंती मिळते. ब्रॉयलर उत्पादनासाठी अनेक खाजगी कंपन्यांनी शेतक-यांबरोबर करार केले आहेत. त्यामुळे विपणनाचा-मार्केटिंगचा फारसा प्रश्न नाही.
सुमारे आठ आठवड्यांपेक्षा लहान, 1.5 ते 2 किलो वजनाचे आणि मऊ लुसलुशीत मांसाचे कोंबडीचे पिलू म्हणजे ब्रॉयलर.
 

उत्कृष्ट व्यवस्थापन पर्याय

 

कक्कुट पालन केंद्राचे

तापमानः पहिल्या आठवड्यामध्ये 950 फॅरनहाईट इतके तापमान आरामदायी (सहज चालण्याजोगे) असते आणि पुढील प्रत्येक आठवड्याला 50 फॅरनहाईटने कमी करत सहाव्या आठवड्यामध्ये ते 700 फॅरनहाईटपर्यंत कमी करावे.
वातायनः हवा चांगली खेळती ठेवावी, पक्ष्यांना गुदमरल्यासारखे होऊ नये यासाठी अमोनिया – पक्ष्यांची विष्ठा नियमितपणे साफ करावी.
प्रकाशः 200 चौरस फूट चटई क्षेत्रासाठी 60 वॅटचा एक बल्ब
चोच साफ करणेः 1 दिवसाचे असताना चोच साफ करावी.
 

बरॉयलरची आरोग्य व्यवस्था

निरोगी पिलांपासून सुरुवात करा
अंडी ऊबवणूक केंद्रांमध्ये मरेक रोगप्रतिबंधक लस द्या
4-5 दिवसांचे असताना आरडीव्हीएफ-1 द्या
कॉक्सिडियोसिस रोखण्यासाठी खाद्यातून औषधे द्या
खाद्य अफ्लोटॉक्सिनमुक्त ठेवा
प्रत्येक चक्रानंतर जमिनीवर किमान तीन इंच जाडीपर्यंत स्वच्छ गवत पसरून ठेवा
 

विपणन

सहा-आठ आठवड्याचे झाल्यावर विपणन करा
पक्षी पकडताना त्यांना जखमा होऊ नयेत यासाठी खाद्य आणि पाणी देण्यासाठीचे चर बाजूला करा
हवामानातील अतिरेकापासून वहनातील पक्ष्यांचे संरक्षण करा
सुगुणा, कोईम्बतूर, व्हीएचएल, पुणे, पयोनियर, ब्रोमार्क, आदी काही खाजगी कंपन्या कंत्राटी ब्रॉयलर उत्पादनामध्ये सहभागी आहेत.
 

ब्रॉयलर पक्ष्यांचे व्यवस्थापन

कोंबडी रोगमुक्त व सशक्त ब्रॉयलर कोंबड्यांची पिल्ले निवडावीत. त्यावरच व्यवसायाचे गणित अवलंबून आहे. हॅचरीमध्ये पिल्लांना लसीकरण झालेले असावे. शिफारशीनुसार लसीकरण करावे.
वादळी वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळावे, तसेच स्वच्छ सूर्यप्रकाश लंबरुपी पडावा यासाठी ब्रॉयलर पक्ष्यांसाठी शेडची रचना करताना उत्तर-दक्षिण दिशेस करावी. पोल्ट्री फार्मच्या जमिनीची पातळी आजूबाजूच्या जमिनीपेक्षा उंच असावी.
 
१) शेडसाठी लागणाऱ्या विजेची उपलब्धता, पाणी व कोंबड्यांची बाजारपेठ जवळच्या अंतरावर असावी.
 
२) शेडमधील जमिनीवर लाकडी भुसा, भाताचे तूस पसरावे. याचा थर कमीत कमी तीन इंचांचा असावा. यामुळे कोंबड्यांच्या शरीराचे तापमान योग्य त्या मर्यादेत राहते.
 
३) पाणी खाद्यपचनास मदत करते. शरीराचे तापमान नियंत्रणाचे काम करते. उन्हाळ्यात साधारण पाण्याची जास्त आवश्‍यकता असते. पाण्यामधून आपण गरजेनुसार कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्त्वे देऊ शकतो.
 
४) रोगमुक्त व सशक्त ब्रॉयलर कोंबड्यांची पिल्ले निवडावीत. त्यावरच व्यवसायाचे गणित अवलंबून आहे.
 
५) हॅचरीमध्ये पिल्लांना लसीकरण झालेले असावे.
 
६) खाद्य अल्फाटॉक्झिनमुक्त असणे गरजेचे आहे.
 
७) लाकडाचा भुसा तीन आठवड्यांनंतर बदलावा. रोजच्या रोज सकाळी किंवा संध्याकाळी थरांची अदलाबदल करावी.
 
८) लसीकरण करताना लसीचा थेंब डोळ्यात किंवा इंजेक्शनाच्या मदतीने पायाच्या मांडीतील स्नायूमध्ये देणे गरजेचे असते.
 
९) कोंबड्या सात आठवड्यांच्या झाल्यावर १.५ ते २ किलोच्या वजनाच्या आसपास विक्रीसाठी तयार होतात.
 
१०) कोंबड्यांची हाताळणी पोल्ट्री शेडपासून विक्रीच्या जागेपर्यंत योग्य पद्धतीने करावी. कारण या कालावधीमध्ये त्यांच्या आरोग्यावर व वजनावर परिणाम होतो.
 

विजेचे व्यवस्थापन –

पोल्ट्री शेडसाठी विजेचा विचार करता, साधारण पहिल्या आठवड्यापासून ते कोंबड्यांच्या विक्रीपर्यंत याचा उपयोग पुढीलप्रमाणे होतो.
 

ब्रॉयलरचे वय —- विजेचा वापर —- जागा

१) ० ते ५ आठवडे —- १५ वॅट —- २०० स्क्वे.फू.
२) ५ ते ८ आठवडे —- ६० वॅट —- २०० स्क्वे.फू.
कोंबडी पिल्लांसाठी आपणाला ब्रुडरची आवश्‍यकता असते. त्याची किंमत ६०० ते १००० रुपयांपर्यंत आहे. ब्रुडर आपण उपलब्ध साहित्याचा वापर करून तयार करू शकतो.
एक मोठी टोपली घ्यावी, त्याला होल्डरच्या आकाराची तीन छिद्रे पाडावीत. त्यामध्ये तीन होल्डर व २०० व्होल्टचा बल्ब लावावा.
यानंतर आतील बाजूस चकचकीत ॲल्युमिनियम फॉईल लावावी. त्याचा वापर रिफ्लेक्टरच्या स्वरूपात होतो.
 

खाद्य व्यवस्थापन –

कुक्कुटपालन व्यवसायातील फायदा आणि तोटा हा खाद्य व्यवस्थापनावर आवलंबून असतो; ७० टक्के खर्च हा खाद्यावर होतो. त्यामुळे खाद्य व्यवस्थापन फायद्याचे ठरते. “कोंबडी पालन “कोंबडी पालन कुकुट पालन व्यवसाय-बॉयलर उत्पादन:- agriculture information in marathi 
 

ब्रॉयलरला खाद्य देण्याची पद्धत –

खाद्याचा प्रकार —- वय (आठवड्यामध्ये) —- प्रथिनांचा समाविष्ट भाग
(a) ब्रॉयलर स्टार्टर —- ०-४ आठवडे —- २९ ते २२ टक्के
(b) ब्रॉयलर फिनिशर —- ४-८ आठवडे—- १९ ते २० टक्के
 
आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या