Weather update: राज्यात पावसाला सुरूवात, ‘या’ जिल्ह्यांना यलो व ऑरेंज अलर्ट

Weather update: राज्यात पावसाला सुरूवात, ‘या’ जिल्ह्यांना यलो व ऑरेंज अलर्ट

 

राज्यात पावसाला सुरूवात झाली आहे. तुरळक ठिकाणी विजांसह पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. ५) दक्षिण कोकण व लगतच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने  वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला आहे. राजस्थानच्या बिकानेरपासून, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. आग्नेय राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. दक्षिण भारतात पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांची स्थिती (शेअर झोन) कायम आहे. वायव्य बंगालच्या उपसागरात रविवारपर्यंत (ता. ७) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.

राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून, पावसाला सुरूवात झाली आहे. आज (ता. ५) कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यासह कोल्हापूर, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

जोरदार पावसाचा इशारा ( ऑरेंज अलर्ट) :

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर.

विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

रायगड, नंदूरबार धुळे, नाशिक, जळगाव, नगर, पुणे, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर.

नांदेडमध्ये अतिवृष्टी

गेले काही दिवस उघडीप देणाऱ्या पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. गुरुवारी (ता.४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नांदेड येथे ९५ मिलिमीटर पावसाची नोंद होत अतिवृष्टी झाली. यामुळे नद्या-नाल्यांना पूर आले. मध्य महाराष्ट्रातील नगर, कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.

राज्यात गुरुवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग)

हे पण वाचा:- Shettale Paper : शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी मिळणार एक लाख रुपये..! वाचा सविस्तर माहिती

कोकण :

रायगड : अलिबाग २२,

रत्नागिरी : लांजा २३.

ठाणे : ठाणे ३७.

मध्य महाराष्ट्र :

नगर : नगर ७७, कर्जत ७४, पारनेर ४०, राहुरी ८४,

कोल्हापूर : गडहिंग्लज ४६, गगनबावडा ६४, हातकणंगले ६९, कागल ५६, करवीर ६३.

सांगली : कडेगाव २८.

सातारा : खंडाळा ३२, पाडेगाव ५१, सातारा ३२.

सोलापूर : करमाळा ७२

मराठवाडा :

औरंगाबाद : गंगापूर ४५,

जालना : बदनापूर ३६.

नांदेड : नांदेड ९५.

उस्मानाबाद : तुळजापूर ४४.

source:- ऍग्रोवोन