Havaman Andaj : आज ‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा अंदाज!

Havaman Andaj : आज ‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा अंदाज!

 

कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मॉन्सूनच्या पावसाने हजेरी लावली आहे. राज्याच्या कमाल तापमानातही घट होऊ लागली आहे. आज (ता. १३) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तर प्रदेशपासून आसामपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. दक्षिण गुजरात किनाऱ्यापासून उत्तर केरळपर्यंत पश्‍चिम किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण गुजरातपासून अग्नेय अरबी समुद्रापर्यंत हवेचा आणखी एक कमी दाबाचा पट्टा समुद्रसपाटीपासून ३.१ ते ४.५ किलोमीटरपर्यंत विस्तारला आहे. यामुळे पश्‍चिम किनारपट्टीवर ढगांची दाटी झाली आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मॉन्सून दाखल झाला आहे. उर्वरित राज्यात पूर्वमोसमीच्या ढगांची छाया असल्याने कमाल तापमानात घट होऊ लागली आहे. रविवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये गोंदिया येथे राज्यातील उच्चांकी ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भाच्या बहुतांश भागात अद्यापही तापमान चाळिशीपार आहे.

रविवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३१.५, नगर ३८.२, धुळे ४०, जळगाव ३९.८, कोल्हापूर २७.६, महाबळेश्‍वर २०.७, नाशिक ३२.२, निफाड ३६.६, सांगली ३०.९, सातारा २९.९, सोलापूर ३४.९, सांताक्रूझ ३३.२, डहाणू ३२, रत्नागिरी २८.५, औरंगाबाद ३४.३, परभणी ४०.१, नांदेड ३४.२, अकोला ४०.१, अमरावती ३७, बुलडाणा २२.९, ब्रह्मपुरी ४१, चंद्रपूर ३७.८, गोंदिया ४१.६, नागपूर ४१, वर्धा ४१.५, यवतमाळ ३९.५.

मॉन्सूनच्या प्रगतीस पोषक हवामान

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बहुतांश कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग व्यापला आहे. मॉन्सूनच्या प्रगतीस पोषक वातावरण असल्याने आज (ता. १३) संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्राचा बहुतांशी भाग, कर्नाटक, तमिळनाडूचा उर्वरित भाग, तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

विजा, मेघगर्जना, जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

कोकण : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, पुणे.

मराठवाडा : उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

रविवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) :

कोकण : कुडाळ, मालवण प्रत्येकी ७०, देवगड, सावंतवाडी प्रत्येकी ६०, अलिबाग ५०, दापोली, पालघर, कुलाबा प्रत्येकी ४०, कणकवली, लांजा, गुहागर, रामेश्वर, मुरूड, डहाणू, राजापूर प्रत्येकी ३०.

हे पण वाचा:- Pm kisan yojana : केंद्र सरकार शेतकऱ्यांना देणार घरबसल्या ६ हजार रु. वाचा सविस्तर माहिती!

मध्य महाराष्ट्र : पाथर्डी, अक्कलकुवा प्रत्येकी ६०, दिंडोरी, धुळे, पन्हाळा प्रत्येकी ५०, सिन्नर ४०, चंदगड, जुन्नर, नांदगाव प्रत्येकी ३०.

मराठवाडा : अहमदपूर, देगलूर, पूर्णा प्रत्येकी ५०, पैठण, मानवत प्रत्येकी ४०, कळमनुरी, लोहा, पाथरी, किनवट, उमरी प्रत्येकी ३०.

विदर्भ : मेहकर, डिग्रस प्रत्येकी ४०, लोणार, अकोला प्रत्येकी ३०, करंजलाड, मनोरा, सिंदखेड राजा, रिसोड, बुलडाणा, तेल्हारा प्रत्येकी २०.

source:-ऍग्रोवोन