Havaman Andaj : राज्यात ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता, जाणून घ्या पुढील तीन दिवसाचे हवामान…

Havaman Andaj : राज्यात ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता, जाणून घ्या पुढील तीन दिवसाचे हवामान…

 

आजपासून पुढचे तीन दिवस राज्यातील वेगवेगळ्या भागात पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने  वर्तवली आहे. गेल्या दोन दिवसापासून पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, पुणे तसेच मुंबई आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, नागपूर मध्ये अंशतः ढगाळ वातावरण  बघायला मिळाले.

आजपासून १३ मे पर्यंत राज्यात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस (Rain Expected) होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी उष्णतेची लाट (Heat Wave) कायम आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे लोक अधिकच घामाघूम झाले आहेत. वाढलेल्या तापमानाचा फटका सगळ्यांना बसत आहे.

तीन दिवसाचे हवामान

12 मे कोकण, गोव्यासह विदर्भातही अवकाळी पावसाची शक्यता, विदर्भातील काही भागात उष्णतेची लाट कामय राहण्याचा अंदाज
13 मे कोकणतील बहुतांश भागात पावसाची शक्यता
14 मे राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज. विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या आसनी चक्रीवादळामुळे यंत्रणाही सतर्क आहेत. या वादळाचा महाराष्ट्राला फटका बसण्याची कोणतीही शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. मात्र या वादळामुळे बंगालच्या बहुतांश भागात वेगानं वारे वाहून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या राज्यांमध्ये पावसाची शक्यता

आसनी चक्रीवादळाचा प्रभाव ओडिशा-आंध्र प्रदेशात दिसून येत आहे. या राज्यातील अनेक भागात पावसासोबत जोरदार वारेही वाहत आहेत. गुरुवारी ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारी भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

संदर्भ:- कृषी जागरण

Leave a Comment