Havaman Andaj : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाचा यलो अलर्ट पहा कुठं होणार जोरदार पाऊस..!

Havaman Andaj : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाचा यलो अलर्ट पहा कुठं होणार जोरदार पाऊस..!

 

कोकणात सुरू असलेल्या पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. आज (ता. ३०) दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा तर उत्तर कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यातही हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

वायव्य अरबी समुद्रात सपाटीपासून १.५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर महाराष्ट्रापासून दक्षिण कर्नाटक पर्यंत किनाऱ्याला समांतर कमी दाब पट्टा सक्रिय आहे. पंजाबपासून बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा कायम आहे. तर आडिशाच्या किनाऱ्यावर समुद्र सपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

दक्षिण कोकण, गोवा, कर्नाटक, केरळच्या किनाऱ्यालगत ढगांची दाटी कायम आहे. विदर्भातही ढग जमा झाले असून, उर्वरित राज्यात ऊन सावल्यांचा लपंडाव सुरूच आहे. अधूनमधून पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत. अनेक ठिकाणी उन्हाची ताप आणि उकाडा कायम आहे. आज (ता. ३०) दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट कायम आहे. रायगड, मुंबई, ठाण्यासह, विदर्भातील बुलडाणा, अकोला, वशीम, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात मॉन्सूनची प्रगती..!

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) उत्तर भारतात प्रगती केली आहे. बुधवारी (ता. २९) संपूर्ण, बिहार, उत्तराखंडसह, हिमाचल प्रदेशचा बहुतांशी भाग, उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. उद्यापर्यंत (ता. १) संपूर्ण अरबी समुद्र, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, दिल्लीसह, राजस्थान, जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाना, चंडीगडच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)?

 रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

 

हे पण वाचा :- शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे का? साध्या पेरणी यंत्राने बीबीएफ पेरणी करता येते..!

 

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट)?

कोकण : रायगड, ठाणे, मुंबई.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मराठवाडा : बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली.

विदर्भ : अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

source :- agrowon