Havaman andaj : पुढील ४-५ दिवसांत महाराष्ट्रात काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार वारे आणि पावसाची शक्यता

Havaman andaj : पुढील ४-५ दिवसांत महाराष्ट्रात काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार वारे आणि पावसाची शक्यता

 

शेतकरी मित्रांनो , राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा चाळीस अंशांवर गेला आहे. उन्हामुळे अक्षरश: लाही लाही होत असून शेतकरी वर्गासह सर्वसामान्य नागरिकही गर्मीमुले ट्रस्ट झाला आहे. दरम्यान सोलापूर आणि परिसरातील काही भागात रविवारी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता. येत्या ३-४ दिवसांमध्ये राज्यातील काही भागात जोरदार वारे आणि गडगडाटासह पाऊस हजेरी लावणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे.

या भागात पावसाचा अंदाज

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार दिनांक 5 एप्रिल रोजी सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, आणि रत्नागिरी या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. या भागाला हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. तर दिनांक सहा एप्रिल रोजी देखील याच भागात विजांसह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर दिनांक सात एप्रिल रोजी सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. पण ७ तारखेला कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.

source:- hello krushi

Leave a Comment