Havaman andaj : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मेघगर्जनेसह बरसण्याचा अंदाज!

Havaman andaj : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मेघगर्जनेसह बरसण्याचा अंदाज!

 

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणात पावसानं हजेरी लावली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गारांचा पाऊस झालाय. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील भांबेड गावात गुरुवारी जोरदार पावसानं हजेरी लावली. जावेळी गारांचा पाऊस लांज्यातील लोकांनी अनुभवला. अवकाळी पावसासोबत गारा पडण्याच्या घडना कोकणात दुर्मिळ आहेत.

मात्र गुरुवारी संध्याकाळच्या सुमारस झालेल्या गारांनी तापमानही घटलं होतं. सोसाट्याच्या वाऱ्यासह रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं हजेरी लावील होती. दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशीही कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागनं म्हटलं होतं.

त्यानुसार पावसाची शक्यता वर्तवली जाते आहे. दरम्यान कोकणासह मराठवाड्यातही पावसानं हजेरी लावली आहे. मालेगाव शहरासह काही गावामध्ये अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामुळे नागरिकांना उकड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळालाय.

दरम्यान, अवकाळीमुळे शेतकऱ्याच्या भाजीपाला पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे. तर दुसरीकडे गुरुवारी सकाळी मुंबई शहरातही पावसाच्या सरी बरसल्या होत्या. तर दिवसभर ढगाळ वातावरण कायम होतं.

विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तसेच 21 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान काही ठिकाणी हलका पाऊस किंवा विजांचा गडगडाट होण्याची शक्यता असल्याचंही सांगण्यात आलं होतं.

source:- tv9 marathi

Leave a Comment