Havaman andaj maharashtra : राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, आता याठिकाणी जोरदार पाऊस पडणार

Havaman andaj maharashtra : राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, आता याठिकाणी जोरदार पाऊस पडणार

 

यावर्षी पावसाने उशिरा का होईना चांगली सुरुवात केली. अनेक धरणे भरली असून नद्यांना पूर आला आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. असे असताना आता कोकणासह राज्यातील इतर भागातला पाऊस  सध्या ओसरला आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक १८ जुलै रोजी पूर्व विदर्भ भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले गेले आहे.

उत्तर महाराष्ट्र , विदर्भ आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचाही शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. सध्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी होण्याचे संकेत आहेत. गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पूर्व किनाऱ्यावर सातत्याने टिकून असलेले कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे असलेला मॉन्सूनचा आस, कमी दाबाचा पट्टा आदी पूरक प्रणालीमुळे राज्यात चांगला पाऊस झाला. यामुळे धरणे देखील भरली.

दरम्यान, आज 18 रोजी गडचिरोली आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट (Weather Update) देण्यात आला आहे तर रत्नागिरी, सातारा, पुणे, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक, अहमदनगर, बीड, लातूर,नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नंदुरबार, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, या भागाला येलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे परिस्थिती बघून शेतकऱ्यांनी शेतातील कामे करावीत.

हे पण वाचा:- Pantpradhan pik vima yojana : पाऊस किंवा वादळामुळे तुमचे पीक नष्ट झाल्यास सरकार नुकसान भरपाई देणार; वाचा सविस्तर

पुढच्या तीन ते चार दिवसात महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढू शकतो, आणि येत्या दोन दिवसात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान तज्ञांनी दिली आहे. यामुळे सध्या कमी झालेला पाऊस पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सध्या सुरु झालेली पेरणीची कामे पुन्हा बंद होण्याची शक्यता आहे.

source:- कृषी जागरण