Hvaman Andaj : मे महिन्यात उन्हाच्या कडाक्यापासून दिलासा मिळणार, 109% पूर्वमोसमी पावसाचा अंदाज

Hvaman Andaj : मे महिन्यात उन्हाच्या कडाक्यापासून दिलासा मिळणार, 109% पूर्वमोसमी पावसाचा अंदाज

 

संपूर्ण एप्रिल महिन्यात महाराष्ट्राचं तापमान तापलेलं होतं. सगळ्यांनाच घामाच्या धारा लागल्या होत्या. अशातच मे महिन्यातही उकाडा कायम राहतो की काय? अशी भीती होती. मात्र, मे महिन्यात  कडाक्याच्या उन्हापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यताय. महाराष्ट्रात मे महिन्यात तापमान एप्रिलच्या तुलनेत कमी राहण्याची शक्यता आहे. मे महिन्यामध्ये बहुतांश भाषात कमाल तापमान सरासरीच्या खाली राहणार असल्याचा अंदाज पुणे हवामान खात्यानं  वर्तवला आहे. पूर्वमोसमी पाऊस सरासरीपेक्षा अधिक होणार असल्याचंही भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून करण्यात स्पष्ट करण्यात आलंय. देशपातळीवर उत्तर-पश्चिम राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार असून संपूर्ण देशात पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 109 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. त्यामुळे आता सगळ्यांचीच नजर ही मॉन्सूनच्या पावसाकडे लागली आहे.

मे महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्यात तापमान कमी राहिल. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार चालू महिन्यात कमाल तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा कमी राहिल तर किमान तापमान थोडं अधिक राहणार आहे. तसंच पूर्वमोसमी पावसामुळे राज्यातील उन्हाच्या झळांची तीव्रता कमी होईल, असंही सांगण्यात आलंय.

दरम्यान, येत्या महिन्यात गोवा, कर्नाटक या राज्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी, तर पाऊस सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. मे महिन्या महाराष्ट्रासह या राज्यातही उन्हाची तीव्रता कमी असणार आहे.

अमरावतीत उष्माघाताचे 3 बळी

दरम्यान, अमरावतीत उष्माघातानं तिघांचा बळी घेतलाय. अमरावतीचं तापमान अक्षरशः लोकांना भाजून काढतंय. पारा 46 अंशांच्या पार गेला आहे. उच्चांकी तापमानामुळे तिघांनी जीव गमावल्याचंही समोर आलंय. सुभाष मोहनसिंह नोतात, जयसिंह चंदनलाल मडावी अशा मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत.

हे पण वाचा:- गुजरात सरकारचा कांदा रेट संदर्भात मोठा निर्णय, मग महाराष्ट्रात का नाही ?

संदर्भ:- tv9 marathi 

लेखक:- सिद्धेश सावंत

Leave a Comment