Mansoon 2022 : मान्सूनचं महाराष्ट्रात ‘या’ तारखेला आगमन! येत्या 48 तासांत केरळात दाखल होण्याचा अंदाज

Mansoon 2022 : मान्सूनचं महाराष्ट्रात ‘या’ तारखेला आगमन! येत्या 48 तासांत केरळात दाखल होण्याचा अंदाज

 

वाढलेल्या तापमानात पाऊस कधी बरसणार, याकडे सगळ्याची नजर लागलीय. यंदा मान्सून लवकर बरसेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र तूर्तास तरी मान्सूनचे आगमनाची तारीख चुकवली आहे. 27 तारखेला मान्सून केरळात  दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र अद्याप मान्सून केरळमध्ये दाखल झाला नसून येत्या 48 ते 72 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल, अशी शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, त्यानंतर आठ ते दहा दिवसांत मान्सून गोव्यासह महाराष्ट्र  आणि पश्चिम बंगालमध्ये दाखल होईल, असं सांगितलं जातंय. केरळात मान्सूनसाठी पोषक स्थिती निर्माण झालेली आहे. मात्र असनी चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनच्या आगमानवर झाला आहे. त्यामुळे मान्सूनचं आगमन लांबणीवर पडत असल्याचं पाहायला मिळतंय. भारतीय हवामान विभागानं याबाबतचा अंदाज वर्तवला आहे.

हवामान तज्ज्ञ कृष्णकांत होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमेकडील वाऱ्यांचा जोर वाढल्याने आणि केरळच्या किनारपट्टीवरील ढगाळ वातावरणात वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. तसंच शुक्रवारीहीदेखील पावसाची सीमा आणखी उत्तरेकडे सरकली असल्याचं त्यांनी म्हटलंय.

ट्वीटमध्ये काय म्हटलं?

ढगाळ वातावरणाने काहिली वाढली

सध्या मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरणाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे उकाडा आणखी वाढलाय. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनपूर्व सरींनी हजेरीही लावली. मात्र त्यानंतर तापमान पुन्हा वाढलं. परिणामी लोकांना उकाड्याचा सामना करावा लागतोय. अशातच मान्सूनच्या सरींची प्रतीक्षा सगळ्यांना आहे.

हे पण वाचा:- 

source:- tv9 marathi