Mansoon 2022 : भारतीय हवामान विभागाने आता मान्सूनची नवीन तारीख सांगितली

Mansoon 2022 : भारतीय हवामान विभागाने आता मान्सूनची नवीन तारीख सांगितली

 

देशात सर्वत्र मान्सूनची  मोठ्या आतुरतेने वाट बघितली जातं आहे. शेतकरी बांधव  चातकाप्रमाणे मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. देशात सर्वत्र शेतकरी बांधव खरीप हंगामाची  तयारी करत आहेत. आता शेतकऱ्यांसाठी नव्हे-नव्हे तर देशातील सर्व जनतेसाठी एक अतिशय महत्वाची आणि थोडी चिंता वाढवणारी बातमी समोर येतं आहे.

खरं पाहता भारतीय हवामान विभागाने  यावर्षी वेळेआधी मान्सून दाखल होण्याचे भाकित वर्तवले होते मात्र आता मान्सूनच्या प्रवासात  थोडा अडथळा निर्माण झाल्याने मान्सून उशिरा दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे. मान्सूनच्या प्रवासात अडथळे निर्माण झाल्याने आता मान्सून केरळमध्ये  दाखल होण्यास उशीर होणार आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, भारतीय हवामान विभागाने या वर्षी 27 मे रोजी मान्सून केरळमध्ये  दाखल होणार असल्याचे भाकित वर्तवले होते. मात्र आता सध्याची परिस्थिती पाहता मान्सून हा जवळपास चार दिवस उशिरा केरळमध्ये दस्तक देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यामुळे मान्सून च्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी बांधवांना अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, मानसून दक्षिण-पश्चिम अरबी समुद्रात नुकताच दाखल झाला आहे. खरं पाहता मान्सून हा दरवर्षी एक जूनला केरळमध्ये दाखल होत असतो. गतवर्षी मान्सून दोन दिवस उशिरा म्हणजेचं तीन जूनला केरळमध्ये दाखल झाला होता.

यंदा मात्र आसनी चक्रीवादळामुळे मान्सून साठी पूरक वातावरण तयार झाल्याने मान्सून केरळमध्ये 27 मेला दाखल होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र आता पुन्हा मान्सूनच्या प्रवासात अडथळे निर्माण झाल्याने मान्सून हा चार दिवस उशिरा केरळमध्ये दाखल होणार आहे.

हे पण वाचा:-Increase seed prices : बियाणांच्या किंमतीमध्ये वाढ अन् ‘डीएपी’ला सल्फर लिंकिंग

यामुळे महाराष्ट्रातही मान्सून पोचायला उशीर होणार असल्याचे सांगितले जात आहे. हवामान तज्ञांच्या मते, पूर्वी मान्सूनचा पाऊस हा 60 दिवस कोसळत असे मात्र आता यामध्ये मोठी घट झाली असून 40 दिवस पावसाचे राहणार आहेत. मात्र पावसाळा हा चांगला राहणार आहे.

संदर्भ:- कृषी जागरण